बॉलिवूडची चुलबूली गर्ल म्हणून आपण जिला ओळखतो अशी अभिनेत्री परिणीती चोप्रा. ती कायमच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसमुळे चर्चेत असते. पण, सध्या ती कुठेच नाही. परिणीती सध्या काय करतेय? असा प्रश्न नक्की तुम्हाला पडला असेल. तर नाही, तसे नाहीये. कारण ती सध्या सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचे शूटिंग करते आहे. तसेच तिचा ‘अ गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामुळेही चांगलीच चर्चेत आलीय. आता पुन्हा ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीये, ते म्हणजे तिची अत्यंत महागडी बॅग. ती नुकतीच या पर्ससोबत एअरपोर्टवर दिसून आली. तुम्ही तिच्या या बॅगची किंमत ऐकाल तर तुम्ही देखील आमच्याप्रमाणेच चकित व्हाल, यात काही शंका नाही.

तुम्हाला माहितीय का, करण जोहर आणि करिना कपूर खान यांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. ज्यावर  सेलिब्रिटींचा एअरपोर्ट लूक चर्चेत असतो.  नुकतीच या ग्रुपवर परिणीतीचा एअरपोर्ट लूक चर्चेत होता. आता असा काय विशेष होता तिचा लूक़ तर होय, ती एकदम हटके दिसत होती. फेंडीचा टी-शर्ट, ब्ल्यू डेनिम्स, ओव्हर कोट आणि एक महागडी बॅग तिने कॅरी केली होती. ही बॅग तिला तिच्या या लूकमध्ये प्रचंड हॉट दिसत होती. या बॅगची किंमत ७५ हजार आहे. ब्लॅक रंगाची ही बॅग तिच्या लूकमध्ये भर घालत होती. 

परिणीतीला तिच्या फॅशन सेंसबद्दल विचारले असता ती म्हणते,‘ आपण ज्या फॅशनला व्यवस्थितपणे कॅरी करू शकतो, तीच फॅशन, आऊटफिट आपण कॅरी करायला हवेत. आपणच जर अन्कम्फर्टेबल असू तर ते समोरच्या व्यक्तीला योग्य दिसणार नाही. फॅशनच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक विषयांना सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करते. नक्कीच त्यामुळे समाजाला काहीतरी फायदाही व्हायला हवा, असा माझा प्रयत्न असतो.’

परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या दोन चित्रपटांवर काम करत आहे. एक म्हणजे, ‘सायना नेहवाल बायोपिक’ आणि ‘अ गर्ल ऑन द ट्रेन’ या दोन चित्रपटांसाठी ती शूटिंग करतेय. चला तर मग ती थोड्याच दिवसात आपल्या भेटीला येणार आहे. शुभेच्छा परिणीती...

Web Title: You will be amazed to hear the price of Parineeti Chopra's 'this' bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.