You can plan a Paris tour at the cost of Deepika Padukone's 'This' dress ... | दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

बॉलिवूडची मस्तानी गर्ल अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची प्रत्येक अदा ही घायाळ करणारी असते. ती कायम तिच्या वेगवेगळया फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. आता हेच बघा ना, नुकताच तिचा एका हॉट ड्रेसमधील फोटो व्हायरल झाला आहे. आश्चर्याची बाब तर ही आहे की, या ड्रेसची किंमत इतकी जास्त आहे की, या किंमतीत तुम्ही पॅरिसला जाऊन येऊ शकता. या ड्रेसबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचंय, मग बघा किती हॉट दिसतेय ती या ड्रेसमध्ये...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कपल असं आहे की, नेहमी ते काहीतरी अतरंगी करत असतात. दीपिकाचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर  चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका इव्हेंटसाठी हा ड्रेस घातला असून रेड पफ स्लिव्ह मधील हा अत्यंत सुंदर ड्रेस आहे. या फोटोतील दीपिकाला तुम्ही पाहाल तर नक्कीच तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. हा तिचा ड्रेस एक लाख चौसष्ट हजार तीनशे अठ्ठयानव रूपयांचा आहे. एवढ्या किंमतीत तुम्ही नक्कीच पॅरिस टूरला जाऊन येऊ शकता, यात काही शंका नाही.


 
दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल हिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेसी अभिनेता दिसणार आहे. तसेच ती ‘८३’ या चित्रपटातही रणवीर सिंगसोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You can plan a Paris tour at the cost of Deepika Padukone's 'This' dress ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.