Then And Now : या दोन बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही ओळखलंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:35 PM2019-12-05T15:35:33+5:302019-12-05T16:15:14+5:30

आपल्या आवडत्या कलाकारांपैकी काहींना आज आपण ओळखूही शकणार नाही.

you can not be able to mahima chaudhary and aamir khan first wife reena | Then And Now : या दोन बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही ओळखलंत?

Then And Now : या दोन बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही ओळखलंत?

Next
ठळक मुद्दे1986 साली 21 वर्षांच्या आमिर खानने त्याची बालपणीची मैत्रिण रिना दत्तासोबत लग्न केले होते.

आपल्या आवडत्या कलाकारांपैकी काहींना आज आपण ओळखूही शकणार नाही. यापैकीच एक चेहरा म्हणजे, सुभाष घईची ‘गंगा’. अर्थात अभिनेत्री महिमा चौधरी. एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महिमाला आज बघाल तर तुम्ही ओळखू शकणार नाही. महिमा सध्या मुंबईत तिच्या मुलीसोबत राहते.
‘परदेस’ या चित्रपटामुळे महिमा एका रात्रीत स्टार झाली. यात तिने ‘गंगा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉक्स ऑफिसवरही महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच.

गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. सध्या ती इतकी बदललीयं, की तिला ओळखणेही कठीण आहे. महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते. पण घई यांनी ‘परदेस’ सिनेमात तिला कास्ट केले आणि त्यांनीच तिचे महिमा असे नामकरणही केले. ‘परदेस’ सिनेमापूर्वी एका जाहिरातीत महिमा झळकली होती. या जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी आपल्या चित्रपटात संधी दिली होती. बॉलिवूडच्याच नव्हे तर महिमाच्या पर्सनल लाईफमध्येही अनेक चढउतार आले. फ्लॉप करिअर, लग्नापूवीर्ची प्रेग्नेंसी, लिएंडर पेससोबतचे अफेअर अशा एक ना अनेक गोष्टींमुळे महिमा चर्चेत राहिली.

रिनालाही ओळखणे झाले कठीण

आमिर खानची पहिली पत्नी रिना हिलाही आता तुम्ही ओळखू शकणार नाही. नुकतीच रिना मुंबईच्या पाली हिल भागात स्पॉट झाली. पण अनेकांनी तिला ओळखू शकले नाही.

1986 साली 21 वर्षांच्या आमिर खानने त्याची बालपणीची मैत्रिण रिना दत्तासोबत लग्न केले होते. रिना त्यावेळी 20 वर्षांची होती. दोघांनाही जुनैद व इरा अशी दोन मुले झालीत. पण 15 वर्षे सुखी संसार केल्यानंतर आमिर व रिना एकमेकांपासून कायद्याने विभक्त झालेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: you can not be able to mahima chaudhary and aamir khan first wife reena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app