Yo Yo Honey Singh new song first kiss release video trending on youtube | VIDEO : यो यो हनी सिंहचं नवं गाणं First Kiss रिलीज, काही मिनिटांमध्येच मिळाले दीड लाख व्ह्यूज....

VIDEO : यो यो हनी सिंहचं नवं गाणं First Kiss रिलीज, काही मिनिटांमध्येच मिळाले दीड लाख व्ह्यूज....

पंजाबी आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर यो यो हनी सिंह याचं नवं गाणं 'फर्स्ट किस' रिलीज झालं आहे. या गाण्यात त्याच्यासोबत इप्सिता मुख्य भूमिकेत दिसत आहे. हनी सिंगच्या नव्या गाण्याने रिलीज होताच यूट्यूबवर धमाका केलाय. यो यो हनी सिंहच्या या पार्टी सॉंगबाबत त्याच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह सुद्धा बघायला मिळतो आहे. गाणं रिलीज होताच काही मिनिटांमध्येच एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

'फर्स्ट किस' या गाण्याला हनी सिंहने आपला आवाज दिला आहे. सोबतच गाणं लिल गोली, होमी दिल्लीवाला, सिंघस्टा आणि यो यो हनी सिंहने लिहिलं आहे. फर्स्ट किस गाण्याताली इप्सिताचा अंदाजही फॅन्सना चांगलाच भावला आहे. लोक भरभरून या गाण्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी हनी सिंहचं 'केअर नी करदा' हे जबरदस्त गाणं रिलीज झालं होतं. छलांग सिनेमातील गाणं 'केअर नी करदा' मध्ये हनी सिंहचा रॅपही ऐकायला मिळाला. त्याच्या या रॅपने सोशल मीडियावरही धमाल केली होती. हा रॅप यो यो हनी सिंहसोबतच अल्फाज आणि होमी दिलवाला यांनी लिहिलं होतं. हनी सिंहचं हे नवं गाणंही सुपरहिट ठरेल हे यात काही शंका नाही.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yo Yo Honey Singh new song first kiss release video trending on youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.