अभिनेता रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटात पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो वडील व मुलगा अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री इरावती हर्षेची एन्ट्री झाली आहे. तीदेखील या सिनेमात रणबीरची आई व पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

'शमशेरा' चित्रपटाची कथा अठराव्या शतकातील असून यात रणबीर कपूर डाकूची भूमिका निभावणार आहे आणि संजय दत्त खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी मार्चपर्यंत संपण्याची शक्यता आहे. 

अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात आधी रणबीर कपूरच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार असे बोलले जात होते मात्र आता इरावती हर्षे दिसणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाशी निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'शमशेरा' चित्रपटात वाणी कपूर व रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना चकीत करेल.

चित्रपटात तिचा स्क्रीन टाइम किती असेल, याची अद्याप माहिती नाही. मात्र तिचे पात्र कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


'शमशेरा' चित्रपटाच्या कथेशी निगडीत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा पीरियड ड्रामा असून रणबीर यात दुर्बल व्यक्तीची भूमिका निभावणार आहे. रणबीरने त्याच्या करियरच्या कारकीर्दीत अशी अॅक्शन सीक्वन्स केलेला नाही असं सांगितलं जातंय. 


रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात व्यग्र आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज होईल.

Web Title: Yash Raj Films Signed Iravati Harshe Opposite Ranbir Kapoor In Shamshera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.