Wow Shashi Kapoor’s grand daughter Aliya Kapoor who stays away from limelight-SRJ | फोटोत दिसणारी मुलगी आहे शशी कपूर यांची नात,तरीही लाइमलाइटपासून राहते लांब

फोटोत दिसणारी मुलगी आहे शशी कपूर यांची नात,तरीही लाइमलाइटपासून राहते लांब

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. बॉलीवुडच्या स्टार आण प्रतिष्ठित घराण्यातील लेकीच्या सौंदर्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

ही स्टार घराण्यातील लेक म्हणजे आलिया कपूर. ही आलिया म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचे अभिनेते शशी कपूर यांची नात. आलियाच्या सौंदर्याची बी -टाऊनमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय. तिच्या सौंदर्यापुढे आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि सुहाना खानसुद्धा फिक्या पडतील. मेरे पास माँ है म्हणत त्यांनी रुपेरी पडद्यावर रसिकांची मनं जिंकली.

विविध सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. शशी कपूर घराण्याचे एकमेव असे सदस्य आहेत ज्यांनी परदेशी मुलीशी लग्न केले. शशी कपूर यांनी जेनिफर केंडलसोबत लग्न केले होते. जेनिफर आणि शशी कपूर यांची तीन मुले कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर आहेत. आलिया कपूर ही शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यांची मुलगी आहे. आलिया कपूर आपले वडील करण कपूर यांच्याप्रमाणेच बॉलीवूड पासून दूर राहणे पसंत करते. इतर स्टारकिड्सप्रमाणे आलिया कपूरचे सोशल मिडियावर फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.

 

आलिया सध्या लंडनमध्ये आपल्या परिवारासोबत राहते. तिचे आई वडिल हे सिनेसृष्टीपासून लांबच असल्यामुळे आलियालर देखील जास्त चर्चा होत नाही. त्यामुळे आलिया कपूरबद्दल ब-याच कमी जणांना माहिती आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत आलिया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची ती विशेष खबरदारी घेते. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे आलिया कपूरदेखी बॉलिवूडमध्ये झळकणार का यावर मात्र काही बोलणे जरा कठिणच आहे.

Web Title: Wow Shashi Kapoor’s grand daughter Aliya Kapoor who stays away from limelight-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.