ठळक मुद्देमाधुरीने सांगितले होते की, मी अनिलसारख्या व्यक्तीसोबत कधीच लग्न करणार नाही. अनिल खूपच भावुक आहे. माझा होणारा नवरा हा अतिशय कुल असला पाहिजे असे मला नेहमी वाटते.

अभिनेता अनिल कपूरचा आज वाढदिवस. अनिलने साठी ओलांडलीय. पण आजही त्याला पाहताच ‘झक्कास’ हा एकच शब्द आठवतो. अनिल कपूरचा फिटनेस हा आजच्या तरुण अभिनेत्याइतकाच आहे. अनिलने गेल्या अनेक वर्षांत त्याच्या अभिनयाद्वारे त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अनिलने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. अनिलने त्याच्या कारकिर्दीत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण त्याची विशेष जोडी ही श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत जमली. माधुरी आणि अनिलच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा देखील झाली होती.

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी ९० च्या दशकातील हिट जोडी होती. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांतमध्ये काम केले आहे. तेजाब, बेटा, राम लखन, किशन कन्हैया, पुकार, हिफाजत, परिंदा, जमाई राजा, प्रतिकार सोबतच अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली. माधुरी आणि अनिल हे दोघेही त्याकाळी अतिशय प्रसिद्ध होते. १९८९ मध्ये एका मुलाखतीत माधुरीला तिच्या आणि अनिलच्या अफेअरबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारण्यात आले होते. त्यावर माधुरीने सांगितले होते की, मी अनिलसारख्या व्यक्तीसोबत कधीच लग्न करणार नाही. अनिल खूपच भावुक आहे. माझा होणारा नवरा हा अतिशय कुल असला पाहिजे असे मला नेहमी वाटते. मी अनिलसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असल्याने मी त्यांच्यासोबत नेहमीच कर्म्फटेबल असते. अनिल आणि माझ्या अफेअरबाबत ज्या चर्चा होतात, त्यावर मी अनेकवेळा विनोद देखील करत असते.

अनिलला माधुरी आणि त्याच्या नात्याबाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी त्याने सांगितले होते की, मी अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मला अनेकवेळा प्रेमात पडण्याची संधी देखील मिळाली होती. पण मला काही क्षणाचा आनंद हवा की आयुष्यभराचा याचा मी नेहमीच विचार करतो. कारण मी माझ्या पत्नीसोबत खूपच खूश आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Wouldn't marry Anil Kapoor, he is hypersensitive," said madhuri dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.