ठळक मुद्देएका  ट्विटमध्ये कमाल आर खानने धर्मासाठी बॉलिवूड सोडणा-या सना खानला लक्ष्य केले.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके आपल्या वादग्रस्त ट्वीटसाठी कायम चर्चेत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करणे, हे केआरकेचे आवडते काम. यावरून अनेकदा तो ट्रोलही होतो. पण केआरके कधीच कोणाची पर्वा करत नाही. आता केआरकेने असे काही ट्वीट केले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आता त्याने कशाबद्दल ट्वीट केले तर थेट कोरोना लसीबद्दल. होय, अदर पूनावालाची लस घेण्यापेक्षा मी बाबा रामदेव यांची लस घेईल, असे त्याने म्हटले आहे.

‘ अदर पूनावाला यांची 1000 रुपये किंमतीची करोना लस घेण्यापेक्षा  बाबा रामदेव यांनी तयार केलेली 22 रुपये किंमतीची करोना लस घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. दोन्ही लस सारख्याच आहेत, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे,’ असे  ट्विट केआरकेने केले आहे.
आता या ट्वीटवरून केआरके ट्रोल होणार नाही, असे कसे होणार? त्याच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले.

 ‘लस अशा माणसांवर फक्त काम करते ज्यांच्याकडे मेंदू असतो. तू त्यासाठी पात्र नाहीस,’ अशा शब्दांत एका युजरने त्याला ट्रोल केले. ‘वो भी मत ले कंजूष, पॅरासिटेमॉल ले ले,’ असे एका युजरने लिहिले. व्हॅक्सिन का मतलब गोली खाना नहीं होता गवार, अशा शब्दांत एकाने त्याची खिल्ली उडवली.

सना खानवर साधला निशाणा
एका  ट्विटमध्ये कमाल आर खानने धर्मासाठी बॉलिवूड सोडणा-या सना खानला लक्ष्य केले. ‘सना खानने बॉलिवूड सोडले आणि एका मौलवीशी लग्न केले. कारण काय तर  इस्लाममध्ये नाचगाणे, न्यूज, फिल्म आदी हराम आहे. पण ती चर्चेत राहण्यासाठी दररोज फोटो, व्हिडीओ पोस्ट करतेय. हा पुरावा आहे की ती मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आणि डेसपरेट आहे. कितीकाळ हे लग्न चालेल?’, असे  ट्विट त्याने केले. सना खानने अलीकडे बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: will take the vaccine of Baba Ramdev instead of Adar Poonawalla vaccine said Kamaal R Khan aka KRK people also gave comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.