समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 09:45 PM2021-09-23T21:45:55+5:302021-09-23T21:46:37+5:30

समांथा आणि नागा चैतन्य या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

Will Samantha Akkineni and Naga Chaitanya be separated? So many crores of alimony demanded | समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी

समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी

Next

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. पण, आजपर्यंत नागा आणि सामंथा यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भलेही सामंथा त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल काही प्रकारचे ट्वीट करत असली तरी पण नागा चैतन्यच्या बाजूने कोणतेही संकेत नाहीत.

सामंथा अक्किनेनी तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवर तिचे नाव बदलून एस असे ठेवले आहे, त्यानंतर त्यांचा घटस्फोट होत असल्याच्या चर्चांना उधाण आले. सध्या अक्किनेनी कुटुंबात काय चालले आहे हे कोणालाही माहित नाही. चेन्नईच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या सामंथाला चित्रपटांतून बरीच ओळख मिळाली आहे.

एका वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लग्नानंतरही तिला ग्लॅमरस जग सोडायचे नव्हते. फोटोशूट आणि तिच्या ग्लॅमरस भूमिकांमधून ती अगदी हटके कामगिरी करत आहे. मात्र, तिचा पती चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना सामंथाचे चित्रपटात काम करत असल्याचे आवडत नाही असे सांगितले जात आहे. 


एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांचे कौटुंबिक न्यायालयात अनेक वेळा हजर झाले आहेत. त्यानंतरही, सामंथा आणि चैतन्याचा निर्णय बदलला नाही आणि जर स्त्रोतांवर विश्वास ठेवला गेला तर घटस्फोटाची पुष्टी होईल. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामंथाला घटस्फोट घेतल्यानंतर कायद्याने द्यावी लागणारी रक्कम एकूण ५० कोटी मिळणार आहे, ज्यात अचल मालमत्ता आणि चालू मालमत्तेचा समावेश आहे.

Web Title: Will Samantha Akkineni and Naga Chaitanya be separated? So many crores of alimony demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app