‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये अजय देवगणने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:55 PM2021-10-21T18:55:34+5:302021-10-21T18:56:15+5:30

‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये अजय देवगण थरारक स्टंट करताना दिसणार आहे.

In 'Into the Wild with Bare Grills', Ajay Devgn reminisces about his father | ‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये अजय देवगणने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’मध्ये अजय देवगणने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा

Next

'इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ हा या ऑक्टोबरमधील डिस्कव्हरी+ वरील एक्स्क्लुझिव्ह आणि अतिशय बहुप्रतीक्षित असा शो आहे. आता आपली उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना त्याची वेळ जवळ जवळ झाली आहे. जगातील सुप्रसिद्ध साहसपटू बेअर ग्रिल्स भारतातील अभिनेता अजय देवगणसोबत साहसाने भरलेल्या थरारक मोहीमेवर सोबत दिसणार आहे. जेव्हा ही जोडगोळी खवळलेला समुद्र आणि हिंदी महासागरातील दुर्गम बेटावर जाताना शार्क्स आणि इतर संकटांचा सामना करेल, तेव्हा हा खिळवून टाकणारा अनुभव बघण्यासाठी तयार राहा.

बेअर ग्रिल्ससोबतच्या चर्चेत अजय देवगणने स्टंट्सबद्दल सांगितले की, होय, मी अनेक स्टंटस केले आहेत, कारण जेव्हा आम्ही फिल्म्समध्ये स्टंटस करायला सुरुवात केली तेव्हा कोणतीही साधने (हारनेसेस) नव्हती. त्यामुळे आम्हांला ३० किंवा ४० फुटांवरून उडी मारावी लागायची. तेव्हा तुम्हांला बॉक्सेसवर पडावे लागायचे आणि शक्यतो नेहमीच तुमचा घोटा किंवा दुसरा अवयव मोडायचा. तुम्ही जमिनीवर पडणार तेव्हा तिथे कोणतीही क्रॅश मॅट नसायची. त्यामुळे तेव्हा आम्ही हे खरेच स्टंट करत असायचो.
आपल्या वडिलांबद्दल बोलताना अजय म्हणाला, “आपले पालक गमावणे खूप कठीण असते. कारण आपल्या आयुष्याच्या पहिल्या २० वर्षांमध्ये आपण त्यांची फिकीरच करत नसतो. आपल्याला वाटते की त्यांना काहीच कळत नाही, ते वेडे आहेत आणि आपल्यालाच सगळे कळते. आणि जेव्हा आपल्याला मुले होतात, तेव्हा पालक असणे म्हणजे काय आणि त्यांनी खरोखर काय केले होते, हे आपल्याला कळू लागते. आणि कधीकधी त्या गोष्टीला फार उशीर झालेला असतो. त्याने म्हटले की, “त्यांना अल्झायमर्सचा त्रास होत होता व त्यांनी केलेल्या स्टंटसमुळे अनेक दुखापती झाल्या होत्या. ते तरुण असताना एकदा त्यांना काच तोडून जावे लागले होते आणि त्या काळी काच तोडणे हे खरोखर काच तोडणे असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर ४५ टाके बसवावे लागले होते.”

Web Title: In 'Into the Wild with Bare Grills', Ajay Devgn reminisces about his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app