कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. मात्र आता अनलॉक करण्यात आले असले तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अशात सेलिब्रेटींचे बरेच किस्से, स्टोरी व थ्रोबॅक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. यादरम्यान दीपिका पादुकोणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात तिने रणबीर कपूरला एक सल्ला दिला होता जे ऐकून कुणाचाच विश्वास बसत नव्हता. हा सल्ला ऐकल्यानंतर नाराज होऊन रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूरने दीपिकाला चांगलेच खडेबोल सुनावले होते.


दीपिका पादुकोण काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या चॅट शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिने पर्सनल लाइफ व रिलेशनशीपबद्दल सांगितले होते. त्यावेळी तिने रणबीर कपूरबद्दलही खुलासा केला होता.


या शोमध्ये जेव्हा करण जोहरने दीपिकाला प्रश्न केला होता की रणबीर कपूरला गिफ्ट काय देशील? त्यावर दीपिका म्हणाली होती की, मी रणबीर कपूरला एक कंडोमचे पाकिट गिफ्ट देऊन कारण त्याचा तो जास्त वापर करतो. यासोबतच दीपिका हेही म्हणाली होती की, रणबीरने कोणत्यातरी कंडोमच्या जाहीरातीतदेखील काम केले पाहिजे.


जेव्हा ही गोष्ट मीडियामध्ये आली होती त्यावेळी रणबीरचे वडील ऋषी कपूर खूप नाराज झाले होते. त्यांनी एका मुलाखतीत दीपिकाला चांगलेच खडेबोल सुनावले होते.

ते म्हणाले होते की, अभिनेत्री सध्या आपल्या करियरवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या शोमध्ये तिला वडीलांच्या प्रतिष्ठेमुळे बोलवण्यात आले होते कारण अद्याप तिने काहीच मिळवले नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why would Deepika Padukone like to gift Ranbir Kapoor a pack of condoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.