ठळक मुद्देशाहरुखने त्याचा टी-शर्ट पकडला आणि त्याच्यावर हात उगारला होता. संजय दत्त आणि त्या पार्टीत असणाऱ्या लोकांनी त्या दोघांना वेगळे केले होते.

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग असून कॉन्ट्रोव्हर्सीपासून दूर राहाणेच तो पसंत करतो. तो कधीच कोणाच्या भांडणात पडत नाही. पण त्याने शिरिष कुंदरला मारले होते असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का... हो, हे असे घडले होते. संजय दत्तच्या पार्टीत शाहरुखने शिरिषवर हात उचलला होता. 

संजय दत्तने 2012 मध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या यशासाठी पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. या पार्टीत शिरिषच्या वागणुकीला शाहरुख अक्षरशः कंटाळला होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, त्या पार्टीत शाहरुख खान रात्री 3.30 वाजता पोहोचलो होता. शाहरुखला पाहाताच शिरिष त्याच्या मागे मागे फिरत होता आणि मी वाट पाहातोय... असे सतत बोलत होता. या गोष्टीमुळे शाहरुख प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले होते. शिरिष आणि शाहरुखच्या वादाला या पार्टीच्या काही महिन्याआधीच सुरुवात झाली होती. रा.वन हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिरिषने ट्वीट केले होते की, 150 करोडचे फटाके फुकट गेले... या ट्वीटनंतर शिरिषची पत्नी फराह खान आणि शाहरुख खानच्या मैत्रीत दुरावा आला होता.

संजयच्या पार्टीत शिरिष सतत मागे फिरत होता आणि त्याच्यात त्याने काही वाईट शब्द शाहरुखसाठी वापरले. त्यामुळे शाहरुखने त्याचा टी-शर्ट पकडला आणि त्याच्यावर हात उगारला होता. संजय दत्त आणि त्या पार्टीत असणाऱ्या लोकांनी त्या दोघांना वेगळे केले होते. या पार्टीत प्रियांका चोप्रादेखील उपस्थित होती. पण शाहरुख तिचे देखील काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

या पार्टीनंतर फराहन म्हटले होते की, शाहरुख नेहमीच म्हणतो की मारहाणीने कोणताच प्रश्न सुटत नाही. चिडून दुसऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी प्रोब्लेम सुरू असल्यानेच तो असे वागतो. या पार्टीनंतर फोटोग्राफर डब्बू रत्नानीने ट्वीट करून म्हटले होते की, मी संजयच्या पार्टीत उपस्थित होतो. माझा शाहरुखला पूर्णपणे पाठिंबा आहे.

या प्रकरणानंतर अनेक वर्षं शाहरुख आणि फराह एकमेकाशी बोलत नव्हते. पण त्यांनी सगळे भेदभाव विसरून आपल्या मैत्रीला पुन्हा एक संधी दिली. 

Web Title: Why Shah Rukh Khan slapped Farah Khan's husband Shirish Kunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.