Why Sara Ali Khan Mom Amrita Singh Hide Her Face From Media | एकेकाळी सिनेसृष्टी गाजवली होती या अभिनेत्रीने आता, चेहरा लपवत फिरण्याची आली तिच्यावर वेळ

एकेकाळी सिनेसृष्टी गाजवली होती या अभिनेत्रीने आता, चेहरा लपवत फिरण्याची आली तिच्यावर वेळ

अभिनेत्री अमृता सिंह सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या ग्लॅमरस लूकवर रसिक फिदा व्हायचे. अमृताने सैफ अली खानसह 1991 मध्ये लग्न केले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ काही टिकले नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट 2004 मध्ये झाला दोघांनी आपले वेगळे मार्ग निवडले.आता ती लाइमलाइटपासून दूर जात आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात बिझी झाली. 


तसेच सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरी लेक सारा अली खानमुळे अमृताची चर्चा रंगतेच. नेहमी सारासह आई अमृता पाहायला मिळते. नुकतेच अमृता मुलांसह मालदीव्हजला व्हॅकेशनसाठी गेले होते. व्हॅकेशनहून परतत असताना एअरपोर्टवर साराला मीडियाच्या कॅमे-यांनी घेतले होते. सारा मीडियाला पोज देत होती तर दुसरीकडे मीडिया दिसताच आई अमृताने मात्र चेहरा लपवत तिथून निघून गेली. याआधीही अमृता सिंह अशाच रितीने चेहरा लपवत मीडियापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. 


यानंतर आपल्या  आईसोबत पुन्हा एकदा मुंबईत एका मंदिराच्या बाहेर दिसली. पण त्यावेळी साराची आई म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग इतरी वेगळी दिसत होती की तिला ओळखणे देखील कठीण झाले होते. अमृता सिंगचा यावेळचा विनामेकअप  लूक पाहिल्यास तिला ओळखणे कठीण जात आहे.

Web Title: Why Sara Ali Khan Mom Amrita Singh Hide Her Face From Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.