ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी कार्तिकने मीडियाला त्याचे व साराचे एकत्र फोटो न काढण्याची विनंती केली होती. 

बॉलिवूडमध्ये लिंकअप आणि  ब्रेकअप नवे नाही. गेल्या काही महिन्यांपासून लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या एका बॉलिवूड कपलच्या ब्रेकअपची बातमी आता चर्चेत आहे. होय, हे कपल कोण तर सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. गेल्या अनेक महिन्यांपासून सारा व कार्तिक एकमेकांना डेट करत होते. पण आता हे नाते संपुष्टात आले आहे. होय, दोघांनीही अगदी विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे कळतेय. याचे कारण पर्सनल नाही तर प्रोफेशनल आहे.

होय, कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले आहे. ‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड येतेय. कार्तिकने ‘पती पत्नी और वो’चे शूटींग पूर्ण केले. यानंतर लगेच तो ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी झाला. पुढील महिन्यापासून कार्तिक या चित्रपटाचे शूटींग सुुरू करतोय. साराचे म्हणाल तर ती सुद्धा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहेत. अशात आपले रोमॅन्टिक नाते पुढे नेण्यासाठी सारा व कार्तिकला बरेच कष्ट घ्यावे लागत होते.

खरे तर कार्तिक व सारा दोघांनीही आपले नाते कधीच लपवले नाही. कार्तिक ‘पती पत्नी और वो’च्या शूटींगमध्ये बिझी असताना सारा तिनदा त्याला भेटायला लखनौला गेली होती. कार्तिकही साराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बँकॉकला गेला होता. पण वेळेचे गणित मॅच करता करता दोघांच्याही नाकीनऊ आले. इतके की, यानंतर दोघांनीही आपआपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला.

नात्यापेक्षा या क्षणाला काम महत्त्वाचे आहे, हा त्यामागचा उद्देश होता. रिलेशनशिपमुळे नव्हे तर आपल्या कामामुळे चर्चेत राहण्याचे त्यांनी ठरवले.
काही दिवसांपूर्वी कार्तिकने मीडियाला त्याचे व साराचे एकत्र फोटो न काढण्याची विनंती केली होती. 

Web Title: why sara ali khan and kartik aaryan broke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.