बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन नेहमी त्याच्या आगामी चित्रपट व भूमिकांमुळे चर्चेत असतो. त्याने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून तो स्टार झाला. हृतिकने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती त्यावेळी तो त्याच्या सहाव्या बोटामुळे चर्चेत होता. हातांना १० नव्हे तर ११ बोटं असल्यामुळे तो एकेकाळी फार चर्चेत होता.

अकरा बोट फार कमी लोकांना असतात. त्यात हृतिकलाही ११ बोटं आहेत. ११ बोटांमुळे हृतिकला फार त्रास सहन करावा लागला होता. एका हाताला सहा बोटं असल्यामुळे शाळेतल्या दिवसांमध्ये त्याला अतिशय वाईट वाटायचं. याबद्दल हृतिकने अनेकवेळा मुलाखतीमध्येही सांगितलं आहे.


शाळेत असताना हृतिकचे मित्र दोन अंगठ्यावरून त्याची टिंगल करायचे. त्यामुळे शाळेमध्ये त्याला आपण इतरांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटायचं. मित्रांच्या सततच्या चिडवण्यामुळे हृतिक त्या मित्रांपासून लांबच राहायचा.


बॉलिवूडमध्ये एन्ट्रीच्या वेळी हृतिकला ही गोष्ट फार त्रासदायक ठरणार होती. मोठ्या पडद्यावर त्याने दोन अंगठे असलेला हाथ अनेकवेळा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. एकदा दोन अंगठे असलेल्या हृतिकच्या हातावरील एक अंगठा त्याने कापण्याचा निर्णयही घेतला होता.


अंगठा कापण्याच्या निर्णयावर त्याने वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली आणि ते हृतिकच्या अंगठ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झाले. पण हृतिकची आई पिंकी रोशन यांना मात्र हे मान्य नव्हतं. लहानपणापासून जर या अंगठ्यामुळे हृतिकला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही तर त्यानं हा अंगठा कापणं चुकीचं आहे, असं त्याच्या आईला वाटत होतं. म्हणून हृतिकने आईचं म्हणणं ऐकून ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला.

Web Title: why hrithik roshan dropped the plan of operating his extra thumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.