अभिनेता सैफ अली खानला नुकतेच चौथे अपत्य झाले आहे. सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. तर करीना कपूरसोबत त्याचे दुसरे लग्न झाले. करीना आणि सैफ यांची दोन मुले आहेत. पहिल्या मुलाचे नाव तैमूर आहे तर दुसऱ्या मुलाचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. सैफ आणि अमृता विभक्त होण्यामागे एका इटालियन मॉडेल कारणीभूत असल्याचे बोलले जाते.


सैफने इटालियन मॉडेल रोजा कॅटलानोसाठी पत्नी अमृताला फसविले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता आणि सैफचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण रोजासोबत सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले जात होते. २००४ साली सैफ आणि रोजाची भेट केन्यामध्ये झाली होती. सैफचे विवाहित जीवन त्यावेळी खूप नाजूक परिस्थितीतून जात होते. त्यावेळी सैफ आणि अमृतामध्ये खूप भांडणे होत होती. रोजाला भेटल्यानंतर सैफला तिच्यावर प्रेम झाले होते.


सैफ आणि रोजाच्या अफेअरचे वृत्त अमृतापासून जास्त काळ लपल्या नाहीत. सैफ फसवत असल्याचे समजल्यावर अमृता त्याच्यासोबत राहणे मंजूर नव्हते. तर सैफला रोजामुळे अमृतापासून वेगळे व्हायचे होते. २००४ साली दोघे विभक्त झाले. त्यानंतर रोजा सैफसाठी मुंबईत आली. सैफने रोजाला देखील फसविले होते. जे तिला मुंबईला आल्यावर समजले.

एका मुलाखतीत रोजाने सांगितले होते की सैफने तिच्यापासून पहिले लग्न आणि मुलांबद्दल सांगितले नव्हते. रोजाला सैफचे लग्न, मुले आणि घटस्फोटाबद्दल भारतात आल्यानंतर समजले होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले होते. त्यावेळी सारा १० वर्षांची होती आणि इब्राहिम ४ वर्षांचा होता.

२००४ साली अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केल होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: why did saif ali khan and Amrita sing get divorced, know the raeson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.