कोरोनाचे वाढते संकट पाहून देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सगळेजण आपापल्या घरात कैद आहेत. सध्या लॉकडाउन चौथ्या टप्प्यात असून लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. अशात सोशल मीडियावर बॉलिवूडशी निगडीत बरेच जुने किस्से व्हायरल होताना दिसत आहेत. अशात बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे बरेच किस्से वाचायला मिळत आहेत. त्यातील त्यांच्या नवऱ्याचा किस्सा सध्या खूप व्हायरल होताना दिसतो आहे. १९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या ७ महिन्यानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

पंजाब केसरीच्या रिपोर्टनुसार, रेखा यांच्या या लग्नाबाबत असं बोललं जातं की, त्यांना हे लग्न आवडलं नव्हतं आणि रेखा लग्नानंतर काही दिवस मुकेश यांच्यापासून लांब राहू लागली होती. मुकेश यांनी रेखा यांच्याकडे जाण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. त्यामुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांच्या परिस्थितीला वैतागून त्यांनी लग्नाच्या ७ महिन्यानंतर आत्महत्येचा मार्ग अवलंबला.


रेखा आणि मुकेश यांचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी रेखा यांचं वय ३५ वर्षे आणि मुकेश यांचं वय ३७ वर्षे होते. एका कॉमन फ्रेंडमुळे त्यांची ओळख झाली होती. मुकेश यांना रेखा पहिल्याच भेटीत आवडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी रेखा यांच्यासोबत लग्न करायचे ठरवले होते. त्यानंतर त्यांनी रेखाला प्रपोझ केले आणि लग्नही झाले.


मुकेश यांनी लग्नानंतर रेखा यांना सांगितले होते की, आपल्या लग्नाबद्दल सिनेइंडस्ट्रीतील फ्रेंड्सना सांगितले पाहिजे. मात्र रेखा अजिबात तयार नव्हत्या. मुकेश यांनी त्यांचे तीन मित्र अकबर खान, संजय खान व हेमा मालिनी यांना भेटण्याबद्दल सांगितले होते. त्यानंतर रेखा व मुकेश हे दोघे एकत्र हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या घरी गेले होते.नतिथे हेमा मालिनी यांनी रेखा व मुकेश यांना एकत्र पाहून म्हटले होते की, आता हे नको सांगूस की तू या माणसासोबत लग्न केले आहेस? त्यावर रेखा यांनी हो सांगितले. मग हेमा मालिनी म्हणाल्या की, हे श्रीमंत आहेत का? त्यावर रेखा यांनी काहीही उत्तर दिले नाही.

रेखा अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होते. हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा त्यांची दीवानी झाली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास १० चित्रपटात एकत्र काम केलं होतं. असंही बोललं जातं की, सिलसिला चित्रपट रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर आधारीत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why did Rekha's husband commit suicide after 7 months of marriage? TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.