ठळक मुद्दे2017 मध्ये प्रियंका व निक यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले आणि दुस-याच वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

प्रियंका चोप्रानिक जोनास लग्नापूर्वी चर्चेत होते आणि आता लग्नानंतरही त्यांची चर्चा कमी नाही. गेल्या महिन्यात या जोडप्याने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या वर्षभरानंतर प्रियंकाने एक मोठ्ठा खुलासा केला आहे. होय, निक जोनासमध्ये असे काय पाहिले की, प्रियंका त्याच्यावर इतकी भाळली, याचा खुलासा प्रियंकाने केला.


 एका ताज्या मुलाखतीत प्रियंकाने तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. होय, अमेरिकन पॉप स्टार निक जोनासच्या ‘क्लोज’ या गाण्याचा व्हिडीओ पीसीने पाहिला आणि ती निकवर कमालीची भाळली.

आता या व्हिडीओत असे काय होते तर, या गाण्यात निक केवळ अंडरगारमेंट्समध्ये दिसला होता. या गाण्यातील निकचा तो हॉट अवतार पाहून प्रियंका त्याच्यावर भाळली. प्रियंकाला तो इतका हॉट वाटला की, तिने त्याला आपला जोडीदार करण्याचा निर्णय घेतला. आहे ना मजेदार...


2017 मध्ये प्रियंका व निक यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले आणि दुस-याच वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. जोधपूरच्या उमेद भवन येथे 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी दोघांचा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता. हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली.  


प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते. म्हणूनच या दोघांच्या संगीत सेरेमनीवर आता एक वेबसीरिज बनतेय.  ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज केली जाईल.  एक सेलिब्रिटी आपल्या लग्नाचे खासगी क्षण सीरिजरूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची ही पहिली वेळ असेल.

Web Title: why did priyanka chopra decide to date nick jonas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.