धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:12 PM2022-01-19T14:12:43+5:302022-01-19T14:13:27+5:30

Dhanush-Aishwarya divorce: गेल्या 18 वर्षांत कधीही धनुष व ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अशात दोघांनीही अचानक घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Why did Dhanush and Aishwarya announce separation? know the reason | धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

धनुषच्या ‘या’ स्वभावाला कंटाळली होती ऐश्वर्या? कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?

Next

Dhanush-Aishwarya divorce: साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) यांचा 18 वर्षांचा संसार मोडला. 18 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दोघांनीही एक स्टेटमेंट जारी करत, आपल्या घटस्फोटाची बातमी जाहिर केली. 2004 साली धनुष व ऐश्वर्या लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर गेल्या 18 वर्षांत कधीही धनुष व ऐश्वर्याच्या वैवाहिक आयुष्यात तणाव असल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अशात दोघांनीही अचानक घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमक्या या घटस्फोटामागचं कारण काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

चर्चा खरी मानाल तर, धनुषचा वर्कहोलिक स्वभाव या घटस्फोटाला कारणीभूत ठरला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, धनुष कामात जरा जास्तच बिझी होता. शूटींगच्या निमित्ताने तो सर्रास घराबाहेर असायचा. पत्नी ऐश्वर्याला तो वेळ देऊ शकत नव्हता. यामुळे दोघांमध्ये तणाव वाढत गेला. कामामुळे धनुषने कधीच वैवाहिक आयुष्याकडे लक्ष दिले नाही. पत्नीसोबतचे मतभेद वाढत असताना धनुष नवीन चित्रपट साईन करत होता. धनुष मुळातच अतिशय प्रायव्हेट पर्सन आहे. आपल्या समस्या, अडचणी कधीही तो मित्रांसोबत शेअर करत नाही. ऐश्वर्यासोबत वाद व्हायचा तेव्हा तो, त्यावर तोडगा काढण्याऐवजी स्वत:ला आणखी कामात गुंतवून घ्यायचा.

धनुषच्या एका मित्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, धनुष व ऐश्वर्या यांच्या नात्यातील तणाव प्रचंड वाढला होता.  

कोणाला मिळणार मुलांची कस्टडी?
धनुष व ऐश्वर्याला यात्रा व लिंगा नावाची दोन मुलं आहेत. यात्रा 16 वर्षांचा आहे तर लिंगाचं वय 12 वर्ष आहे. यात्रा व लिंगाची कस्टडी कोणाकडे असेल, याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. पण धनुष व ऐश्वर्याने दोन्ही मुलांचा एकत्र सांभाळ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय.  

Web Title: Why did Dhanush and Aishwarya announce separation? know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app