Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 07:03 PM2019-12-13T19:03:02+5:302019-12-13T19:04:01+5:30

Lokmat Most Stylish Awards : महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने स्टायलिश पैलूंना हेरून अशा हटके पर्सनॅलिटीजना समाजासमोर आणायचे ठरविले आहे.

Who will be the most stylish of Maharashtra ...? | Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?

Lokmat Most Stylish Awards 2019 : कोण ठरणार महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश...?

Next

महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील आघाडीचे दैनिक लोकमतने महाराष्ट्राच्या मातीतील स्टायलिश पैलू हेरुन २०१६ सालापासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे आयोजन दैनिक लोकमतच्या वतीने करण्यात येते.यंदा या सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे.


मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मराठी मातीत स्टाइलच्या प्रतिमेला पुरस्काराचे कोंदण देण्याच्या अभिनव कल्पनेने उभा महाराष्ट्र मोहरून गेला आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टायलिश व्यक्तीमत्त्वांना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. येत्या १८ डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे.


मराठी चित्रपटसृष्टी असो बॉलिवूड किंवा मग टीव्ही, फॅशन आणि उद्योग जगतातील कोणताही व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरु शकतो. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.

गेल्या वर्षी रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, उर्वशी रौतेला, सारा अली खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, सोनू निगम, जॅकी श्रॉफ, सई ताम्हणकर, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ जाधव व प्रिया बापट यासह अनेक सेलिब्रेटींचा खास अंदाज पाहायला मिळाला होता.

त्यामुळे यंदाच्या सोहळ्याला उपस्थिती लावणारे सेलिब्रेटी कोणत्या अंदाजात रेड कार्पेटवर अवतरणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Who will be the most stylish of Maharashtra ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app