महेश मांजरेकरव्दारे दिग्दर्शित 'अंतिम - द फायनल ट्रुथ' हा सिनेमा चर्चेत आहे. कधी सिनेमाच्या शूटिंगला घेऊन तर कधी सिनेमात सलमानसोबत रोमान्स करणाऱ्या हिरोईनला घेऊन. अखेर या गोष्टीचा खुलासा झाला आहे की सलमानसोबत अंतिममध्ये कोण अभिनेत्री झळकणार आहे. प्रज्ञा जैसवाल सलमानच्या अपोझिट अंतिममध्ये दिसणार आहे. सध्या सलमान अंतिमचे शूटिंग करतो आहे.   

प्रज्ञा जैसवाल हा इंडस्ट्रीमधील नवीन चेहरा नाही. प्रज्ञाने आतापर्यंत अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अंतिममधून ती बॉलिवूडध्ये एंट्री करणार आहे. यापूर्वीही प्रज्ञा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय होती. 2014 मध्ये आलेल्या 'विराट्टू आई डेगा' सिनेमातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती 2015मध्ये एका तेलुगु चित्रपटाचादेखील भाग देखील होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक कृष यांच्या 'कंचे' चित्रपटासाठी प्रज्ञा जैसवालला फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल डेब्यू- साउथचा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर प्रज्ञाने मागे वळून पाहिले नाही.  प्रज्ञाने पुणे विद्यापीठातून आपले शिक्षण घेतले असून यादरम्यान तिने ब्युटी पेजेन्टमध्येही भाग घेतला. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला

सलमान खान प्रॉडक्शनखाली तयार होत आहे. यात आयुष शर्माच्या अपोझिट महिमा मकवाना बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who is pragya jaiswal who will be seen opposite salman khan in antim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.