ठळक मुद्देअरहानसोबतच माझा पाळीव कुत्रा कॅस्परदेखील माझ्यासाठी प्रचंड खास आहे. अनेकवेळा अरहान मला विचारतो की, तू आमच्या दोघांपैकी जास्त प्रेम कोणावर करतेस... त्यावर माझे एकच उत्तर असते की, माझ्याकडे एक नव्हे तर दोन मुले आहेत.

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत अफेअर असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. तिचे लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. पण अर्जुनमुळे तिने अरबाजला घटस्फोट दिला. अरबाज आणि तिला एक मुलगा असून घटस्फोटानंतर तो मलायकासोबतच राहातो. पण मलायकाला एक नसून दोन मुले असल्याचा धक्कादायक खुलासा तिने नुकताच नेहा धुपियाच्या कार्यक्रमात केला आहे.

नेहा धुपियाच्या नो फिल्टर या कार्यक्रमात तिने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान तिने आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी नेहासोबत गप्पा मारल्या आहेत. या कार्यक्रमात तिने अरहानविषयी मनसोक्त गप्पा मारल्या. तिने सांगितले की, माझ्या आयुष्यात अरहानची एक खास जागा आहे. अरहानसोबतच माझा पाळीव कुत्रा कॅस्परदेखील माझ्यासाठी प्रचंड खास आहे.

अनेकवेळा अरहान मला विचारतो की, तू आमच्या दोघांपैकी जास्त प्रेम कोणावर करतेस... त्यावर माझे एकच उत्तर असते की, माझ्याकडे एक नव्हे तर दोन मुले आहेत आणि दोघांवर देखील मी तितकेच प्रेम करते. त्यावर तो मला लगेचच विचारतो की, पण पहिल्या नंबरवर मीच आहे ना... त्यावर मी सांगते, मी असे करूच शकत नाही... कारण माझ्यासाठी तुम्ही दोघेदेखील सारखेच आहात... 

मलायकाने या मुलाखतीत हे देखील सांगितले की, मी सावळी असल्याने सुरुवातीला इंडस्ट्रीमधील लोकांचा माझ्यासोबत वागण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. पण नंतर लोकांनी मला स्वीकारले. मलायका एक ट्रेंड डान्सर आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिने डान्स शिकायला सुरुवात केली. मलायकामध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे. ती आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस झालीय. एक गोष्ट मात्र कायम आहे, तो म्हणजे, तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. मलायकाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी ती प्रचंड फिट आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.


 

Web Title: Who does Malaika Arora love more? Son Arhaan or pet dog Casper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.