माधुरी दीक्षित-नेने... बॉलीवुडची धकधक गर्ल... तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय... तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मराठमोळ्या माधुरीने मोठ्या मानाने मिरवलं आहे. लग्नानंतर माधुरी आपल्या संसारात आणि मुलांमध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही. त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रियालिटी शोच्या माध्यमातून माधुरी रसिकांच्या भेटीला येत असते. सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळ्यांमध्येही माधुरीचं दर्शन रसिकांना होत असतं. अनेकदा अभिनेत्रींना शूटिंगदरम्यान विचित्र अनुभव येत असतात असाच एक किस्सा माधुरी दिक्षितचाही आहे.

माधुरी दिक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान सिनेमा रसिकांना चांगलाच माहिती आहे. सिनेमातील दोघांवर चित्रीत झालेले बोल्ड सीन्स आणि गाणे आजही रसिक विसरलेले नाहीत.याच सिनेमादरम्यान माधुरीला भयानक अनुभव आला होता. किसींग सीनचे शूट सुरू होते त्याचदरम्यान विनोद खन्ना यांनी माधुरी दिक्षितच्या ओठांचाच चावा घेतल्याचे बोलले जाते. 

विशेष म्हणजे दिग्दर्शकाच्या सुचनेकडेही विनोद खन्ना यांचे लक्ष गेले नाही. कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना यांनी स्वतःला सावरले नव्हते. आणि याच कारणामुळे 'दयावाननंतर' माधुरीने कधीच विनोद खन्नासह सिनेमात काम केले नाही. 'दयावान'मधल्या माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातल्या किसिंग सिनवर खूप टीका झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: While shooting a kissing scene with Madhuri Dixit, Actor Vinod Khanna get exited while acting intimate scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.