जर तुम्ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा चित्रपट बाजीगरचे चाहते असाल तर या सिनेमात त्याच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार सुमीत पाठकचा भोळा चेहरा आठवत असेल ना... या चित्रपटातील शाहरुख खानसोबतच सुमीतचे कामही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. असं म्हणतात की सिनेइंडस्ट्रीत करियर करणं सर्वांसाठी सोप्पे नसते असेच काहीसे सुमीत सोबत झाले.

1993 साली शाहरुख खानचा चित्रपट बाजीगरमध्ये सुमीतचा फार छोटीशी भूमिका होती. पण त्याने ही भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात जागा निर्माण केली होती. शाहरुखच्या बालपणीची भूमिका सुमीतने साकारली होती जो आपल्या आई-वडिलांच्या अन्यायाचा साक्षीदार असतो. अभिनेत्री राखी यांच्या मुलाच्या भूमिकेत असलेला सुमीत मोठेपणी शाहरुख साकारतो.

सुमीत गेल्या काही कालावधीपासून सिनेमा व टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. सुमीतने काही सिनेमा व मालिकांमध्ये काम केले आहे. पण तो सोशल मीडियापासून खूप दूर आहे.

सुमीत सलमान खानसोबत 2002 साली सुपरहिट ठरलेला चित्रपट 'तुमको न भूल पाएंगे'मध्ये झळकला होता. या चित्रपटात सलमान व सुमीत शिवाय सुश्मिता सेन व दीया मिर्झादेखील होती. याशिवाय तो 2004 साली अजय देवगणच्या टारझन द वंडर कारमध्येदेखील दिसला होता. यात आयशा टाकिया व वत्सल शेठदेखील मुख्य भूमिकेत होते.

सिनेमामध्ये सुमीतचे करियर अयशस्वी ठरले. त्यानंतर तो छोट्या पडद्याकडे वळला. त्याने हॉरर शोमध्ये काम केले. हीरो शक्ती की भक्ती या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. हा शो 2005 ते 2007 असे वर्ष चालला. त्यानंतर तो कुठेच दिसला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Where is Sumit Pathak, who played Shah Rukh Khan's childhood role in 'Baazigar'? TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.