where is ranu mondal today, new song is coming | एका रात्रीत ‘स्टार’ झालेली रानू मंडल सध्या आहे तरी कुठे?
एका रात्रीत ‘स्टार’ झालेली रानू मंडल सध्या आहे तरी कुठे?

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी रानूच्या मुलीने रानूचा मॅनेजर अतींद्र चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते.

काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. काही दिवसांपूर्वी रानू मंडलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि रानू एका रात्रीत स्टार झाली होती. लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गीत गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू अनेकांच्या नजरेत भरली, तिच्या आवाजाने हिमेश रेशमिया सारखा दिग्गज गायक व संगीतकारही प्रभावित झाला. त्याने आपल्या सिनेमात  रानूला पार्श्वगायनाची संधी दिली. एकापाठोपाठ एक अशी तीन गाणी त्याने रानूकडून रेकॉर्ड करून घेतली. यानंतर तर रानू भलतीच लोकप्रिय झाली. पण गेल्या काही दिवसांपासून रानू गायब असल्याचे दिसतेय. साहजिकच रानू कुठे आहे, काय करतेय? असे प्रश्न अनेकांना पडले. पण  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की रानू मंडल सध्या प्रचंड बिझी आहे.  


सध्या रानूच्या बायोपिकचे काम सुरू आहे आणि रानू यात बिझी आहे. नुकताच रानूला पासपोर्ट मिळाला आहे. तिचे आॅफिशियल फेसबुक पेज नुकतेच तयार करण्यात आले असून त्यावरुन तिच्या कामविषयीचे अपडेट शेअर केले जात आहेत. तिच्या फेसबुक पेजला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.


रानूला नवी ओळख मिळवून देणारा अतींद्र चक्रवर्ती हा तिचे फेसबुक पेज हॅन्डल करत असून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रानूची माहिती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे.


काही दिवसांपूर्वी रानूच्या मुलीने रानूचा मॅनेजर अतींद्र चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. अतींद्र चक्रवर्ती हा मला माझ्या आईला भेटू देत नाही, असे तिने म्हटले होते. इतकेच नाही तर अतींद्र माझ्या आईच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही रानूच्या मुलीने केला होता. अर्थात रानूने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.


Web Title: where is ranu mondal today, new song is coming
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.