भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणा-या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. विविध सिनेमातल्या भूमिका वाट्याला येताच स्मिता पाटील यांनी जणू काही त्या रुपेरी पडद्यावर जिवंत केल्या. विलक्षण अभिनय, बोलके डोळे, हुशार आणि सामाजिक बांधिलकीचं भान त्यामुळेच रसिकांच्याही आवडत्या अभिनेत्री बनल्या होत्या. छोट्याश्या करिअरकाळात त्यांनी जवळपास 80 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले. त्यात 'निशान्त', 'चक्र', 'मंथन', 'भूमिका', 'गमन', 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्थ', 'बाज़ार', 'मंडी', 'मिर्च मसाला', 'अर्धसत्य', 'शक्ति', 'नमक हलाल', 'अनोखा रिश्ता' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कामामुळे रसिक नाराज होतील असे काम त्यांच्याकडून होणार नाही याची त्या विशेष काळजी घ्यायच्या. म्हणूनच 'नमक हलाल' सिनेमावेळी स्मिता पाटील यांना खूप पश्चाताप झाला होता. 'नमक हलाल' सिनेमात स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती.


''आज रपट जाये तो....'' या गाण्यासाठी स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांना भरपावसात गाणे शूट करायचे होते. पावसात चिंब भिजलेल्या स्मिता पाटीलला रसिक स्विकारणार नाहीत. अशी भीती त्यांना होती. संपूर्ण गाणं शूट झाल्यानंतर त्यांना रडू कोसळले. दुस-या दिवशी अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांची समजूत काढली. भूमिकेची गरज म्हणून अशा प्रकारे गाणे शूट करावे लागले. 

ब-याचदा मनाच्याही पलिकडे जावून आपली भूमिका साकारावी लागते अशाप्रकारे अमिताभ यांनी स्मिता पाटील यांची समजूत काढली होती. ज्या सीनमुळे स्मिता पाटील नाराज होत्या. हेच गाणे रसिकांनी डोक्यावर घेतले. त्यावेळच्या सुपरहिट गाण्यापैकी  ''आज रपट जाये तो'' हे गाणेही सुपरहिट ठरले. आजही पावसाची गाणी म्हटले की सगळ्यात आधी याच गाण्याची आठवण नाही झाली तर नवलच.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Smita Patil cried whole night after shooting the hot rain dance sequence with Big B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.