सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट तिघांनी 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिघांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. 'स्टुडन्ट ऑफ द इयर सिनेमातून आलिया आणि सिद्धार्थ  पहिल्या चित्रपटापासूनच दोघांत वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली. तेव्हापासूनच आलिया आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या.

मात्र गेल्या काही वर्षांत या लव्ह बर्ड्समध्ये दुरावा आल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु होत्या. दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जात होतं. दोघेही फार एकत्र पाहायला मिळाले नाहीत. मात्र  'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सिद्धार्थने आलियाबद्दल अनेक मजेदार गोष्टी सांगितल्या होत्या.  शूटिंगच्या वेळी सर्वात अवघड क्षण कोणता होता असा  प्रश्न सिद्धार्थला विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की, आलियाला किसिंग करणे सर्वाधिक अवघड आणि अनकम्फर्टेबल तितकेच, विचित्र होते.

 

सिद्धार्थ म्हणाला होता की, 'आलियासोबत किसिंग सीनची रिहर्सल करणं खूप विचित्र होतं. त्यावेळी डोके, ओठ आणि नाकाचा एंगल कसा असावा अशी सर्वकाही गोष्टींचा विचार करून किसिंग सीन शूट केला जाणार होता. अनेकदा या किसिंग सीनसाठी रिहर्सल आम्ही करायचा. मात्र काही काळानंतर ते खूप कंटाळवाणे वाटायला लागले.या मुलाखती दरम्यान सिद्धार्थने असेही म्हटले होते की, दीपिका पादुकोण ऑनस्क्रीन किसिंग करायला  नक्कीच आवडेल.

सिद्धार्थ अखेर 'मरजावां' चित्रपटात दिसला. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होती. सिद्धार्थ आणि ताराची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. सिद्धार्थ लवकरच एका अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे.विशेष म्हणजे चित्रपटात तो डबल रोलमध्ये दिसणार आहे.

चित्रपटाचे नाव समोर आले नसले तरीही यावर्षी हा चित्रपट 20 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. खुद्द सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. तसेच सिद्धार्थ एका तमिळ चित्रपटाच्या रीमेकमध्येही दिसणार आहे. भूषण कुमार, मुराद खेताणी आणि वर्धन केतकर निर्मित या चित्रपटात सिद्धार्थ एक बिझनेसमन आणि खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या दिल्लीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Sidharth Malhotra Felt kissing Alia Bhatt On Screen Was Boring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.