When salman khan was asked to smooch bhagyashree gda | सलमान खानला भाग्यश्रीला पकडून तिला Kiss करायला सांगितले, त्यावर भाईजानने दिले होते हे उत्तर

सलमान खानला भाग्यश्रीला पकडून तिला Kiss करायला सांगितले, त्यावर भाईजानने दिले होते हे उत्तर

सलमान खान आणि भाग्यश्रीच्या जोडीने मैंने प्यार किया सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ही जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. विशेष म्हणजे सलमानने त्याच्या पहिल्याच सिनेमात निर्माता -दिग्दर्शक यांना नो किसिंग सीनची त्याची अट सांगितली होता आणि सलमानची ती अट आजही कायम आहे. मैेनै प्यार प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर सलमानला भाग्यश्रीला पकडून स्मूच करायला सांगितले होते. कदाचित त्या फोटोग्राफरला आपल्या फोटोसाठी सलमान-भाग्यश्रीला स्मूच करतो अशी पोज हवी असेल. 

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार भाग्यश्रीने एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला होता की, फोटोग्राफरने सलमानला सांगितले की भाग्यश्रीला पकडून स्मूच कर त्यावेळी तो फोटोग्राफर सलमानच्या फार जवळ उभा होता. तर सलमान भाग्यश्रीच्या खूप जवळ उभा होता. भाग्यश्री काहीवेळासाठी चिंतेते होती, तिला काय करु सुचत नव्हते.

भाग्यश्रीने सांगितले की,सलमानने असे करण्यास नकार दिला.सलमानने फोटोग्राफरला सांगितले आधी भाग्यश्रीकडे जाऊन तिची परवानगी घ्यावी. त्यावेळी भाग्यश्रीच्या लक्षात आले कळले की, सलमान तिची इतक्या लोकांच्या गर्दीतही किती काळजी घेतो. विशेष म्हणजे भाग्यश्रीने फक्त एका सिनेमात काम केले.त्यानंतर ती इंडस्ट्रिमधून गायब झाली होती.  2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड अलर्ट - द वॉर विदिन’ या सिनेमात ती अखेरची दिसली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When salman khan was asked to smooch bhagyashree gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.