बॉलिवूडची सर्वात स्टाइलिश दिवा मलाइका अरोरा अर्जुन कपूर यांचं नातं नेहमीच  चर्चेत असते. मलायकाला बर्‍याचदा प्रश्न विचारला जातो की ती तिच्यापेक्षा दहा वर्षापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. यात मलायकाला काहीच हरकत नाही. तसे, मलायका यापूर्वी या विषयावर अनेकदा उघडपणं बोलली आहे.

यापूर्वी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलाइका म्हणाली होती की, 'पुरुष जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा काही फरक पडत नाही, परंतु जेव्हा एखादी स्त्री तसं करते ते तेव्हा पाप आहे, का?' जेव्हा एखादा माणूस त्याच्यापेक्षा लहान असलेल्या महिलेला डेट करतो, तेव्हा लोक त्याला ड्यूड म्हणतो, परंतु जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलाला डेट करते तेव्हा सगळ्यांना ते खटकते. 

मलायका म्हणाली, 'नेहमीच हा भेदभाव होत आला आहे. हे वाईट आहे आणि मला आशा आहे की यात बदल होईल. बरेच काही बदलत आहे परंतु तिथे पोहोचायला अजून थोडा वेळ लागेल.


2019मध्ये ऑफिशल केलं होतं रिलेशनशीप
मलायका अरोराने 2019 मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी त्यांचं नांत ऑफिशल केलं होतं. मलायकाने अर्जुनबरोबर तिचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसे, मलायका आणि अर्जुन यापूर्वीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, परंतु तोपर्यंत त्यांनी हे स्वीकारलेले नव्हते की ते एकमेकांना डेट करतायेत. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When malaika arora spoke about dating a younger man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.