When Mahesh Bhatt Locked Lips With His Own Daughter Pooja Bhatt | महेश भट आपल्या मुलीसोबतच करू इच्छित होते लग्न; जाणून घ्या कारण
महेश भट आपल्या मुलीसोबतच करू इच्छित होते लग्न; जाणून घ्या कारण

ठळक मुद्देआजही महेश भट त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

 महेश भट यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. चित्रपटांइतकेच महेश भट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वाद ओढवून घेणारे महेश भट एकदा अशाच एका मोठ्या वादात अडकले होते.  होय, करिअरच्या अगदी पिकवर असताना ८०च्या दशकात महेश भट यांच्या एका खळबळजनक किस्स्याने संपूर्ण बॉलिवूडच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा त्यांची मोठी लेक पूजा भट सुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून खूप लोकप्रिय होती. 

याच दरम्यान एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर महेश भट व त्यांची मुलगी पूजा भट या दोघांचा एकमेकांना लिप लॉक करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. हा फोटो प्रसिद्ध झाला आणि मोठे वादंग उठले. बापाचा मुलीसोबतचा लिपलॉक करतानाचा फोटो पाहून सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वाद अंगलट येत असल्याचे दिसताच महेश भट यांनी एक पत्रकार परिषद बोलवली. पण हे काय, या पत्रकार परिषदेत ते असे काही बोलले की, सगळ्यांनाच धक्का बसला.


  
 पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते, असे ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याने वाद आणखीच चिघळला. महेश भट कधी नव्हे इतके  टिकेचे धनी ठरले. अखेर महेश भट यांना सारवासारव करावी लागगली.  गेल्या काही दिवसांत झालेल्या वादामुळे मी नैराश्यात गेलो होतो. यामुळे मी असे विधान केले, असे सांगून त्यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात याऊपर आजही महेश भट त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.  
 

Web Title: When Mahesh Bhatt Locked Lips With His Own Daughter Pooja Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.