'शेरशाह'च्या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा कियारा आडवाणी डिंपल चीमाला भेटली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:08 PM2021-08-10T13:08:23+5:302021-08-10T13:08:48+5:30

परम वीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

When Kiara Advani met Dimple Cheema on the occasion of 'Sher Shah' movie! | 'शेरशाह'च्या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा कियारा आडवाणी डिंपल चीमाला भेटली!

'शेरशाह'च्या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा कियारा आडवाणी डिंपल चीमाला भेटली!

Next

परम वीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.  सिद्धार्थ मल्होत्रा ​​कारगिल युद्धाच्या नायकाची भूमिका साकारत आहे, तर कियारा अडवाणीने त्याची प्रेयसी डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे, जिणे शूर हुतात्म्याच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली.

तिच्या भूमिकेची तयारी करत असताना आणि लष्कर आणि तिच्या कुटुंबाचा भावनिक प्रवास समजून घेताना, कियाराने आपल्या प्रियजनांपासून दूर राहून देशाची सेवा करणाऱ्या लष्करी पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अनेक कथा वाचल्या.  या अनोख्या प्रेमकथेबद्दल जाणून घेण्यासाठी, ती डिंपलला भेटली जो अभिनेत्रीसाठी एक जबरदस्त अनुभव होता. यामुळे तिच्या व्यक्तिरेखेमध्ये खरेपणा राहण्यास मदत झाली.

डिंपलला भेटल्यानंतर कियाराचे तिच्याबद्दल प्रेम आणि आदर आणखी वाढला.  सिद्धार्थ सोबत कियारा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे.  चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री आवडत आहे.  बॉलिवूडनेही चित्रपटाच्या ट्रेलरसह सिद्धार्थ आणि कियाराचे कौतुक केले आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे.


या वर्षीचा स्वातंत्र्य दिन शौर्य, प्रेम आणि त्यागाच्या अविश्वसनीय कथेचा साक्षीदार असेल. विष्णु वर्धन दिग्दर्शित, धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट यांची संयुक्तपणे निर्मिती, शेरशाह कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) च्या जीवनावर आधारित आहे.  

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि धर्मा प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने अॅमेझॉन ओरिजिनल मूव्ही 'शेरशाह'चा जागतिक प्रीमियर १२ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.

Web Title: When Kiara Advani met Dimple Cheema on the occasion of 'Sher Shah' movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app