ठळक मुद्देटॅक्सी नं. 9211’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी एका अपघाताच्या दृश्यात मी रस्त्यावर गडगडत जातो आणि माझ्या आजूबाजूला गाड्या धावत आहेत असे दाखवायचे होते. योगायोगाने माझी आई तिच्या गाडीने सेटजवळून जात होती आणि तिला वाटले की मला खरोखर अपघात झाला आहे.

अभिनेता जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे खूपच चांगले प्रमोशन या चित्रपटाची टीम करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जॉन, मृणाल आणि रवी किशन कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होणार यात काहीच शंका नाहीये. ‘बाटला हाऊस’ मधील हे त्रिकूट त्यांचे चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस घडलेले काही मनोरंजक किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत.
 


जॉन बरोबर झालेल्या संभाषणात कपिलने जॉनची आई फिरोजा इराणी त्यांच्या मुलाचा चित्रीकरणाच्यावेळी झालेला अपघात पाहून घाबरल्या होत्या अशी चर्चा मीडियात रंगली होती हे खरे आहे का असे जॉनला विचारले. त्यावर पुष्टी देत जॉन म्हणाला, “हो, हे खरे आहे. ‘टॅक्सी नं. 9211’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी एका अपघाताच्या दृश्यात मी रस्त्यावर गडगडत जातो आणि माझ्या आजूबाजूला गाड्या धावत आहेत असे दाखवायचे होते. योगायोगाने माझी आई तिच्या गाडीने सेटजवळून जात होती आणि तिला वाटले की मला खरोखर अपघात झाला आहे. ती गुजरातीमध्ये ओरडायला लागली, “मारो डिकरो-मारो डिकरो छे. सू थई गयू...” नंतर त्याने तिला शांत करत समजावून सांगितले की ते खरे नव्हते तर तो शूटिंग करत होता.


 
अफवांचा क्रम कायम ठेवत कपिलने आणखी एका अफवेबद्दल चौकशी केली की जॉनने ‘बाटला हाऊस’चा दिग्दर्शक निखिल अडवानी याला एका शॉर्टमध्ये आपल्या बेअर बॉडीचे शूट करण्यास सांगितले जेणेकरून तो आपल्या आकर्षक शरीराची चमक दाखवू शकेल. याविषयी जॉनने सांगितले, “हो, हे सुद्धा खरे आहे. या चित्रपटासाठी मी माझ्या शरीरयष्टीवर भरपूर मेहनत घेतली आहे. म्हणून मी त्याला दृश्यांमध्ये क्लोज-अप शॉट्सपेक्षा मिड शॉट्स घेण्याची गळ घातली.” जॉन आपल्या दररोजच्या आहारात मखाणे (कमळाचे बी) आवर्जून खातो हे देखील त्याने या कार्यक्रमात सांगितले.

शो मध्ये पुढे मृणाल आणि रवी किशनदेखील त्यांच्या वैयक्तिक तसेच व्यवसायिक जीवनातील अनेक किस्से सांगत उपस्थितांना खळखळून हसवले. 


Web Title: When John Abraham's Mother Got Scared Watching Him Dodge Fast Cars for a Scene
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.