ठळक मुद्देदिव्याने सांगितले होते की, लंडनमध्ये झालेल्या एका शो मध्ये माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली होती. पण चूक लगेचच माझ्या लक्षात आल्याने मी ती सुधारली देखील होती. पण आमिरच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने माझ्यासोबत परफॉर्म करायला नकार दिला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून मिरवणारा आमिर खान याचा आज वाढदिवस. आमिर वर्षातून केवळ एकाच चित्रपटात काम करतो. पण त्याचा एकच चित्रपट वर्षभराची कमाई करतो. आमिरने त्याच्या करियरमध्ये अनेक टॉपच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण आमिरने एका अभिनेत्रीला चक्क रडवले होते आणि त्याच्यामुळे तिला चित्रपट देखील गमवावा लागला होता. ही अभिनेत्री दुसरी कोणी नव्हे तर दिव्या भारती होती. 

दिव्या भारतीने बोबिली राजा या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती. दिव्याने विश्वात्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर तिने दिल का क्या कसूर, शोला शबनम, दिवाना, दिल आशना है, रंग यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले.

दिव्या भारती आणि आमिर खान एका शो साठी लंडनला गेले असता त्यांच्यात भांडणं झाली होती अशी बातमी त्या काळी वर्तमानपत्रात आली होती. दिव्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती की, लंडनमध्ये झालेल्या एका शो मध्ये माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली होती. पण चूक लगेचच माझ्या लक्षात आल्याने मी ती सुधारली देखील होती. पण आमिरच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने माझ्यासोबत परफॉर्म करायला नकार दिला होता आणि त्याने माझ्याऐवजी जुही चावलासोबत परफॉर्म केले होते. तसेच त्याने मी खूप थकलोय हे कारण देत माझ्यासोबत मेडली करण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे मी खूपच उदास झाली होती आणि बाथरूममध्ये जाऊन मी कित्येक तास रडले होते. पण मी शो साठी पैसे घेतल्याने माझ्याकडे परफॉर्म करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी सलमान खान माझ्या मदतीला धावून आला होता आणि त्याने माझ्यासोबत मेडली परफॉर्म केले होते.

एवढेच नव्हे तर शाहरुख खान आणि सनी देओलच्या डर या चित्रपटात जुही चावला नव्हे तर दिव्या भारती मुख्य भूमिकेत होती. पण आमिर खानमुळेच या चित्रपटातून तिचा पत्ता कापण्यात आला होता असे तिच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Divya Bharti cried because of Aamir Khan and Salman Khan came to the rescue PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.