एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे टीव्ही अभिनेत्री निया शर्मासोबत. 

 

निया शर्माच्या ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिची तुफान चर्चा झाली होती. यावेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केला होता. पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे निया भलतीच नर्व्हस झाली होती . तिचा नर्व्हसनेस पाहून ती या वेब सीरिजमुळे नर्व्हस असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

 मात्र खुद्द नियाने यावर स्पष्टीकरण दिले होते. अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून गेली. त्यामुळे या वेब सीरिजमुळे नाही तर या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे तिने स्पष्ट केले होते. ही वेब सीरिज योग्य पद्धतीने प्रमोट होत असल्याचा आनंदही तिने व्यक्त केला होता. 


 
यापूर्वीही त्यांनी नियासाठी ड्रेस डिझाइन केलेले आहेत. त्याने डिझाईन केलेली ड्रेसिंग स्टाईल नियाला पसंत आहे. मात्र पहिल्यांदाच हा डिझायनर ड्रेस नियासाठी डोकेदुखी ठरला. त्यामुळे संपूर्ण इव्हेंटमध्ये निया नर्व्हस दिसली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When the designer dress for Nia Sharma became a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.