When Bhumi Pednekar Ride cycle for 17 km To Reach Durgavati Movie Location | चेह-यावर रूमाल बांधून 17 किमी सायकल चालवत शूटिंग लोकेशनवर पोहचली ही अभिनेत्री

चेह-यावर रूमाल बांधून 17 किमी सायकल चालवत शूटिंग लोकेशनवर पोहचली ही अभिनेत्री

'दुर्गावती' चित्रपटात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा व भूषण कुमार करत आहे. या चित्रपटाची घोषणा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. या चित्रपटाचं शूटिंग भोपाळमध्ये होत आहे. भूमी ज्या हॉटेलमध्ये राहाते, तेथून शूटिंग लोकेशन सुमारे 17 किमी दूर आहे. अशात भूमीने सायकल चालवून शूटिंग स्पॉटपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. 


सायकलिंगचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. भूमी सकाळी शूटिंगसाठी निघाली. यापूर्वी तिने आपला चेहरा रुमालाने झाकला होता. आउटडोर सायकलिंगचे पूर्ण रेकॉर्डही तिने शेअर केले, ज्यामध्ये तिच्या स्मार्ट वॉचमध्ये टायमिंग आणि किमी दिसत आहेत.  चित्रपटात अरशद वारसीदेखील व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे. दुर्गावती चित्रपट भागमती चित्रपटाचा रिमेक आहे. भागमतीमध्ये मुख्य भूमिकेत अनुष्का शेट्टी होती. चित्रपटाची कथा हॉरर व सस्पेन्सने परिपूर्ण होती. 

एकेकाळी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे वजन ९० किलो होते. मात्र आता तिने वजन घटविले असून दिवसेंदिवस ती जास्त ग्लॅमरस दिसते आहे. भूमी अभिनयाव्यतिरिक्त स्टाईल स्टेटमेंटमुळेदेखील चर्चेत येत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर बाथटबमधील न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर कमेंट्स व लाईक्सचा वर्षाव होतो आहे.बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली दम लगा के हईशा चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. मात्र आता ती फिट झाली असून दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Bhumi Pednekar Ride cycle for 17 km To Reach Durgavati Movie Location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.