when amitabh bachchan was harassed by dimple kapadia on pending payment | डिम्पल कपाडियाने अमिताभ बच्चन यांच्या आणले होते नाकीनऊ, आजही विसरू शकले नाहीत बिग बी

डिम्पल कपाडियाने अमिताभ बच्चन यांच्या आणले होते नाकीनऊ, आजही विसरू शकले नाहीत बिग बी

ठळक मुद्देपुढे अमिताभ यांचा सुवर्णकाळ पुन्हा परतला. पण आजही डिम्पलचे ते वागणे, ते सततचे फोन आणि पैशांसाठीचा तगादा अमिताभ विसरू शकलेले न

आजघडीला अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. पण एकेकाळी अमिताभ नावाच्याच याच महानायकावर बंगला गहाण ठेवण्याची वेळ आली होती. 1996 साली अमिताभ यांनी एबीसीएल नावाची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती. सुरुवातीला या कंपनीचे प्रोजेक्ट नफ्यात राहिले. पण काही वर्षांनी ही कंपनी बुडाली. कंपनी बुडाल्याने अमिताभ कर्जबाजारी झालेत. त्यांची आर्थिक स्थिती इतकी खराब झाली की, ते एका एका पैशासाठी मोताद झाले होते. कर्जाच्या वसूलीसाठी आलेले लोक घराबाहेर ओरडू लागले होते. यापैकीच एक होती डिम्पल कपाडिया.डिम्पल कपाडियाने त्याकाळात अमिताभ यांच्या नाकीनऊ आणले होते. तिच्या वागण्याने अमिताभ इतके दुखावले होते की, आजही ते दु:ख अमिताभ विसरू शकलेले नाहीत.

एबीसीएलकडे इतके पैसे नव्हते की, ते कलाकारांची फी देऊ शकेल. त्यामुळे अनेक कलाकारांचे पैसे अडकले होते. डिम्पलने 1997 मध्ये अमिताभ यांच्या ‘मृत्यूदाता’ या सिनेमात काम केले होते. हा सिनेमा अमिताभ यांनीच प्रोड्यूस केला होता. पण पैशांच्या चणचणीमुळे अमिताभ कुठल्याही कलाकाराची फी देऊ शकत नव्हते. डिम्पलचेही पैसे थकले होते. अशात अमिताभ यांची स्थिती समजून घेण्याऐवजी डिम्पलने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

अमिताभ यांना सतत फोन करून पैशांसाठी तगादा लावणे सुरु केले. इतकेच नाही तर स्वत:च्या सेक्रेटरीला पैसे मागण्यासाठी अमिताभ यांच्या बंगल्यावर पाठवले होते.
पुढे अमिताभ यांच्या नशीबाने कलाटणी घेतली. केबीसी सारखा शो आणि मोहब्बते या सिनेमाच्या रूपात यश चोप्रा यांनी दिलेला मदतीचा हात या जोरावर अमिताभ यांचा सुवर्णकाळ पुन्हा परतला. पण आजही डिम्पलचे ते वागणे, ते सततचे फोन आणि पैशांसाठीचा तगादा अमिताभ विसरू शकलेले नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when amitabh bachchan was harassed by dimple kapadia on pending payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.