जेव्हा आराध्या अभिषेक बच्चन ऐवजी 'या' अभिनेत्यालाचा समजली होती तिचा बाबा, कोण होता 'तो' ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:00 PM2021-07-27T18:00:02+5:302021-07-27T18:04:53+5:30

आराध्या ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. अनेकदा ऐश्वर्या राय-बच्चन सोशल मीडियावर आपल्या मुलीसह फोटो पोस्ट करताना दिसते.

When Aishwarya Rai’s daughter Aaradhya Bachchan once thought Ranbir Kapoor was her father | जेव्हा आराध्या अभिषेक बच्चन ऐवजी 'या' अभिनेत्यालाचा समजली होती तिचा बाबा, कोण होता 'तो' ?

जेव्हा आराध्या अभिषेक बच्चन ऐवजी 'या' अभिनेत्यालाचा समजली होती तिचा बाबा, कोण होता 'तो' ?

Next

आराध्या म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभि-ऐशची लाडकी लेक... आराध्या ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. अनेकदा ऐश्वर्या राय-बच्चन सोशल मीडियावर आपल्या मुलीसह फोटो पोस्ट करताना दिसते. यावर चाहते भरभरून लाईक्स करत असतात.आराध्याचा असाच एक किस्सा समोर आला आहे.

 

(Also Read :सुपरमॉम ऐश्वर्या राय बच्चन देणार गुडन्यूज ? दुसऱ्यांदा होणार आई, फोटोमुळे चर्चेला उधाण)

 

‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमावेळी खुद्द ऐश्वर्यानेच आराध्याचा हा मजेशीर किस्सा सांगितला होता. सिनेमात  ऐश्वर्या आणि रणबीर कपूर दोघांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमापेक्षा दोघांमध्ये रंगलेल्या ऑनस्क्रीन रोमान्समुळेच जास्त चर्चा रंगल्या होत्या.शूटिंगच्यासेटवर एकदा आराध्या ऐश्वर्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी रणबीर कपूरलाच तिचे वडील समजली होती. ज्या दिवशी आराध्या सेटवर आली होती.

 

त्यादिवशी रणबीरचा लूकही अभिषेकच्या लूकप्रमाणे मिळता जुळता होता.  अभिषेक बच्चनसारखा ड्रेसिंग रणबीरने केले होते. आराध्याला समजेल तोपर्यंत तिने रणबीर कपूरला मिठी मारली होती. नंतर आराध्याला तिची चूक कळाल्यावर ती खूप लाजली होती.चुकून रणबीरलाच वडील समजल्याचे ऐश्वर्याने सांगितले होते.


ऐश्वर्याने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. नेहमीच बच्चन बहू ऐश्वर्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मात्र तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे आता दुसरीच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळते आहे.

ती जिथे जाते तिथे ऐश्वर्या आता लुज कपडे परिधान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे पोट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशाप्रकारच्या ड्रेसिंगमुळे ऐश्वर्या दुस-यांदा आई बनणार असून ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहे.गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्याची बदलेली स्टाइल पाहूनच तिच्या चाहत्यांना हा प्रश्न पडणार स्वाभाविक आहे. तुर्तास यावर ऐश्वर्याकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Aishwarya Rai’s daughter Aaradhya Bachchan once thought Ranbir Kapoor was her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app