ठळक मुद्दे लवकरच अभिषेक बच्चन ‘बिग बुल’ या सिनेमात दिसणार आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन पित्याच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत आला. पण इतक्या वर्षांत पित्यासारखे यश मात्र त्याला मिळवता आले नाही. यशाची चव चाखण्याआधीच ‘फ्लॉप अ‍ॅक्टर’चा शिक्का त्याच्या माथी बसला. हा शिक्का अभिषेकला अद्यापही पुसता आलेला नाही. २००० साली ‘रेफ्युजी’ या   चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी  चित्रपटांमध्ये कामे करत तीन फिल्मफेअर  पुरस्कारांवर नाव कोरले. पण अभिषेकला ‘फ्लॉप अ‍ॅक्टर’ म्हणून हिणवणा-यांच्या हे गावीही नाही. तूर्तास अभिषेकबद्दलचा एक जुना किस्सा व्हायरल होतोय. हाच  किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, 2002 मधला हा किस्सा. अभिषेकने स्वत: हा किस्सा मीडियासोबत शेअर केला होता. अभिषेकचा ‘शरारत’ हा सिनेमा रिलीज झाला होता. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी चित्रपट पाहिल्यानंतरच्या प्रेक्षकांच्या भावना जाणून घेण्यासाठी अभिषेक मुंबईच्या गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये गेला.

इंटरवल झाला आणि अभिषेक थिएटरबाहेर एका स्टँडवर उभा झाला. याचदरम्यान एक महिला आली आणि तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता अभिषेकच्या श्रीमुखात लगावली. केवळ इतकेच नाही तर कुटुंबाचे नाव धुळीस मिळवू नकोस, जमत नसेल अ‍ॅक्टिंग सोड, असे ती त्याला म्हणाली. तिचा तो अवतार पाहून अभिषेक जागच्या जागी थिजला. हा किस्सा अभिषेक आजही विसरू शकला नाही. आजही त्या महिलेचे ते शब्द त्याला आठवतात.

अभिषेक बच्चनने  सुमारे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या  ‘मनमर्जियां’ मधून वापसी केली होती. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. निश्चितपणे या कौतुकाने अभिषेकला एक नवी ऊर्जा दिली. पण या चित्रपटाचा अभिषेकच्या करिअरला मात्र फार काही उपयोग झाला नाही. लवकरच तो ‘बिग बुल’ या सिनेमात दिसणार आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when aishwarya rai bachchan husband abhishek bachchan was slapped by woman for big reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.