श्वेता नंदाने  २२ व्या वर्षीच दिल्लीतील व्यावसायिक निखिल नंदासह लग्न केले होते. निखिल नंदा हा रणबीर कपूरचा चुलत भाऊ लागतो. म्हणून श्वेताही रणबीरची वहिनीचे देखील नाते आहे. श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे विविध फोटोंच्यामाध्यमातून तिच्या आयुष्यातील घडामोडी सा-यांनाच माहिती असतात. मात्र एक गोष्ट आहे जी आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. श्वेता नंदाही सध्या पती निखिल नंदाबरोबर राहत नसून त्यांचा घटस्फोट झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून श्वेताही बच्चन कुटुबियांसोबत राहत आहे. या घटस्फोटाचे नेमके कारण समोर आले नसले तरी हे दोघे सध्या वेगळे राहत आहेत. तसेच श्वेताने इस्टाग्रामवर देखील नंदा आडनाव काढत केवळ श्वेता बच्चन ठेवले आहे.आता दिल्ली सोडून श्वेताने थेट मुंबई गाठत आई-वडिलांसह राहणे पसंत केले आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांना दोन मुलं आहेत. मुलगी नव्या नवेली आणि अगस्त्य असे त्यांच्या मुलांची नावं आहेत.श्वेता आपल्या मुलांसह सध्या आई-वडिलांच्याच घरी राहत आहे. अशात मात्र वहिनी ऐश्वर्या रायची एक सवयीमुळे श्वेता हैराण असते. 

एका चॅट शोमध्ये जेव्हा श्वेता बच्चनला ऐश्वर्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की तिला ऐश्वर्याच्या सर्व गोष्टी आवडतात पण तिच्या एका सवयीमुळे तिला खूप वाईट वाटते. ऐश्वर्या फोन व मेसेजचे उत्तर कधीच देत नाही. यामुळे मला तिच्यावर खूप राग येतो पण आजपर्यंत फोन आणि मेसेजला उत्तर का देत नाही हे माहित नाही. याचदरम्यान करणने श्वेताला अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये उत्कृष्ट कलाकार कोण असा प्रश्न विचारला. यावेळी श्वेताने भावाची बाजू घेत अभिषेकचं नाव घेतले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when Aishwarya Rai Bachchan gets shocked after Shweta Bachchan's ugly comment On her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.