ठळक मुद्देसलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर सुरू असताना सलमान तिला न सांगता सोमीला आर्थिक मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी तिला पैशांची गरज होती. पण ही गोष्ट त्याने ऐश्वर्याला सांगितली नव्हती.

सलमान खान आणि सोमी अली यांचे एकेकाळी अफेअर होते. स्टारडस्ट मासिकात आलेल्या बातमीनुसार, सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले याची सोमीला कल्पना देखील नव्हती. ती सलमानसोबत लग्न करण्याची स्वप्नं पाहात होती. पण तिला त्यांच्या अफेअरविषयी कळल्यावर ती कायमची परदेशात निघून गेली. त्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या अधिकच जवळ आले. सलमानच्या कुटुंबियांसोबत विशेषतः अल्विरा आणि अर्पिता या त्याच्या बहिणींसोबत तिचे नाते खूपच चांगले होते. 

हॉल ऑफ फेम ऐश्वर्या राय या बिस्वदीप घोष यांच्या पुस्तकानुसार तर सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने ऐश्वर्या घर सोडून अंधेरीतील लोखंडवालामध्ये एकटी राहात होती. पण २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरासमोर गोंधळ घातला आणि तिने दरवाजा न उघडल्यास बिल्डिंगमधून उडी मारण्याची धमकी दिली होती. तिथून खऱ्या अर्थाने त्यांचे नाते तुटायला सुरुवात झाली. 

सलमानने २०१२ मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्याच्या घरासमोर ते प्रकरण त्या दिवशी घडले हे खरे आहे. पण मीडियाने अनेक गोष्टी वाढवून लिहिल्या. एखाद्या नात्यात असताना तुमची एकमेकांसोबत भांडणं ही होतात. मी आणि ऐश्वर्या देखील नात्यात होतो. त्यामुळेच आमच्यात त्या दिवशी काही खटके उडाले होते. तिचे घरातले लोक अतिशय चांगले आहेत. माझ्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या गोष्टींमुळे ते ऐश्वर्याला मला भेटण्यापासून थांबवत होते आणि त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाहीये.

सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर सुरू असताना सलमान तिला न सांगता सोमीला आर्थिक मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी तिला पैशांची गरज होती. पण ही गोष्ट त्याने ऐश्वर्याला सांगितली नव्हती. यामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती असे वृत्त स्टारडस्टने दिले होते. त्यानंतर काहीच महिन्यात त्यांचे ब्रेकअप झाले होते. तिने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या दारुच्या सवयीला मी कंटाळले होते. दारूच्या नशेत तो अनेकवेळा भांडायचा, याच गोष्टीमुळे मी ब्रेकअप करण्याचे ठरवले. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सलमानसोबत काम न करण्याचा ऐश्वर्याने निर्णय घेतला आणि आजवर त्यांनी कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले नाही.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Aishwarya Rai Bachchan confessed about relationship with salman Khan PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.