बाबो! एकेकाळी ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 01:11 PM2021-05-13T13:11:41+5:302021-05-13T16:28:42+5:30

आम्ही रस्त्यावर फिरायचो टॅक्सी आणि ऑटो थांबवायचो. 

When aamir kha stick posters on auto rickshwas to promote his film qayamat se qayamat tak old video viral | बाबो! एकेकाळी ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, कारण वाचून व्हाल थक्क

बाबो! एकेकाळी ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, कारण वाचून व्हाल थक्क

Next

 आमिर खान  (Aamir Khan)ला परफेक्शनिस्ट व्यतिरिक्त मार्केटिंगमधील जीनियससुद्धा म्हटले जाते. तो आपल्या चित्रपटांच्या मार्केटींग कॅपॉनमध्ये सक्रिय सहभाग घेत असतो आणि त्याचे चित्रपट खूप यशस्वी सुद्धा होतात.  आमिर चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन येत असतो.

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आमिरचा 'कयामत से कयामत तक'  (Qayamat Se Qayamat Tak) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा तो चित्रपटाचा उत्तम प्रकारे प्रमोशन करत असे. याचाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात आमिर चित्रपटाचे पोस्टर्स वेगवेगळ्या ऑटो-रिक्षांमध्ये चिटकवताना दिसतो आहे.

या व्हिडिओमध्ये तरुणपणीचा आमिर खान ब्लू कलरच्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये अनेक पोस्टर्स हातात घेऊन दिसत आहे. त्याच्यासोबत मित्र आणि सह-अभिनेता राज जुत्शी (Raj Zutshi)  देखील दिसतो आहे. दोघे ऑटो रिक्षा थांबवतात आणि ड्रायव्हरला विचारतात की, त्यांच्या सिनेमाचे पोस्टर रिक्षाच्या मागे लावू शकतो का?

लोक विचारायचे - कोण आहे आमिर खान ?
व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, आमिर म्हणतो, “ जुत्शी, मी, मंसूर आणि त्याची बहीण नुजहात, आम्ही रस्त्यावर निघायचो  टॅक्सी आणि ऑटो थांबवायचो. 
आम्ही त्यांना सांगायचो की, हे पोस्टर चिपकवा आमच्या आगामी सिनेमाचे आहे. काही लोक तयार व्हायचे तर काही नकार द्यायचे आणि विचारायचे हा कोणता सिनेमा आहे?, यात कोण आहे?, आमिर खान कोण आहे? मग मी सांगायचो मी आमिर खान आहे. आम्ही खूप प्रयत्न करायचो की लोकांना आमच्या सिनेमाविषयी माहिती देण्याचा.  

जुही चावलासोबत केला होता डेब्यू 
आमिरने 'कायमत से कयामत तक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती अभिनेत्री जूही चावलासमवेत दिसली होती. हा चित्रपट हीट झाला होता.  
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When aamir kha stick posters on auto rickshwas to promote his film qayamat se qayamat tak old video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app