सोशल मीडियावर सध्या सेलिब्रेटी आपले कुकिंग व्हिडीओ, वर्कआऊट व्हिडीओ तसेच विविध गोष्टी करत स्वतःला कसे बिझी ठेवत आहेत. याविषयीची अपडेट चाहत्यांसह शेअर करतात अशात या अभिनेत्रींने देखील तिच्यासंदर्भातील माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. हा फोटो शेअर करताच अवघ्या काही तासाच वा-यासारखा व्हायरल झाला. मुळात व्हायरल झालेल्या फोटोत अभिनेत्रीचा चेहरा झाकलेला असल्यामुळे ती नेमकी कोण ही जाणून घेण्याची देखील उत्सुकता आहे. तर ही आहे आहाना कुमरा. अनेकांसाठी आहाना कुमरा परिचयाची असेल तर अनेकांसाठी नाही. फोटोंमुळे अनेकजण तिची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतायेत. 

अहानाने काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानच्या 'बेताल' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरीजची निर्मिती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली होती. ही वेबसिरीज अहानासाठी खास होती कारण ती स्वत: एसआरकेची मोठी फॅन आहे. एसआरकेद्वारा निर्मित वेबसिरीजचा भाग होणे म्हणजे अहाना तिचे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. आणि याच वेबसिरीजसाठी तिने खास भूमिकेसाठी अशाप्रकारे प्रोस्थेटीक मेकअप केला होता. त्या शूटिंग दरम्यानच्या काही अनुभव तिने शेअर केले आहेत. या मेकअपमुळे तिला आलेले भयावह रूप कशारितीने तिने यावर मेहनत घेतली यासंदर्भातील फोटोद्वारे तिने अनुभव शेअर केला आहेत.

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमातही अहाना कुमरा मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. या सिनेमात तिने बोल्ड भूमिका केली होती. तसेच ती द अॅक्सिडेटंल प्राईम मिनिस्टर सिनेमातही ती झळकली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Aahana Kumra Did Prosthetics for Betaal Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.