बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन चित्रपटाव्यतिरिक्त माजी पत्नी सुजैन खानमुळे चर्चेत असतो. हृतिक व सुजैनचा भलेही घटस्फोट झाला असला तरी त्या दोघांमधील नाते अजूनही चांगले आहे. याच कारणामुळे हृतिक व सुजैन बऱ्याचदा एकत्र दिसतात.  


काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा सुपर ३० चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची समीक्षकांनी व प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली. सुपर ३० चित्रपटाच्या यशानंतर हृतिक रोशनने नुकताच डीएनएला मुलाखत दिली. त्याने त्याच्या खासगी आयुष्य व एक्स पत्नी सुजैन खानबद्दल सांगितलं. त्याने एक्स पत्नी असतानाही सुजैन खान व आपल्या मुलांमध्ये कसे नाते ठेवलं आहे तेदेखील सांगितलं.


हृतिक रोशनने सांगितलं की, सुजैन आणि मी एकमेकांचा आदर करतो. आमची दोन मुल ऋदान व रेहान रोशन यांना आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं नाही. मला लोक विचारतात की एक्स पत्नीसोबत इतका चांगला कसा काय राहू शकतो. त्यांना देखील सांगत असतो की वडील असल्याच्या नात्यानं दोन्ही मुलांसोबत राहतो आहे आणि त्यांना समजावं की त्यांच्या आईला प्रेम व आदर दिला जातो.


पुढे त्याने सांगितलं की, आमच्या मुलांना समजलं पाहिजे की दोन लोक विभक्त झाल्यानंतर एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकत्र आहोत. ही खूप दुःखद बाब आहे की सुजैनसोबत माझे बॅलन्स ठेवणं जरा कठीण आहे. मात्र आमच्या मुलांच्या आनंद व शांतीसाठ आम्ही प्रयत्न करत राहतो.


हृतिक रोशन व सुजैन खान यांचं नातं खूप स्पेशल आहे. दोघांचा घटस्फोट झाला असला तरीदेखील ते आजही फ्रेंड्ससारखे भेटतात.आपल्या मुलांसोबत वेळ व्यतित करतात. मुव्ही व डिनर डेटवर एकत्र जातात. या दोघांनी लग्नाच्या १४ वर्षानंतर २०१४ साली घटस्फोट घेतला.

विभक्त झाल्यानंतर ५ वर्षांनंतर देखील त्यांच्या नात्यात बॉण्डिंग पहायला मिळतं. ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Web Title: This is what Hrithik Roshan has to say about his cordial relation with ex-wife Sussane Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.