What is Arshad Warsi saying? So my feet are as sexy as Deepika, so I'm showing! | ​ अर्शद वारसी म्हणतोय काय? तर माझे पाय दीपिका इतकेच सेक्सी, म्हणून मी दाखवतोय!

​ अर्शद वारसी म्हणतोय काय? तर माझे पाय दीपिका इतकेच सेक्सी, म्हणून मी दाखवतोय!

अर्शद वारसी, हाफ पॅन्टमध्ये आणि तोही लॅक्मे फॅशनवीकमध्ये? आश्चर्य वाटले ना? अर्थात असे घडता घडता राहिले. गेल्या काही दिवसांपासून अर्शद हाफ पॅन्टमध्ये दिसतोय. अगदी अनेक पब्लिक प्लेसमध्येही. लॅक्मे फॅशन वीकमध्ये अर्शद वारसीला सामील व्हायचे होते. या ठिकाणीही अर्शद असाच हाफ पॅन्टमध्ये जाणार होता. पण वाईफ मारियाने ऐनकेन प्रकारे त्याची समजूत काढली. अखेर अर्शद फार्मल कपडे घालून या शोमध्ये सामील झाला.

आता अर्शदला अचानक हाफ पॅन्ट इतकी का आवडू लागली? तर त्यामागे एक कारण आहे. होय, अलीकडे अर्शदला एक अपघात झाला. त्याच्या पायाचा काही भाग बाईकच्या सायलेन्सरनी भाजला गेला आणि त्याची मोठी जखम झाली. यामुळे डॉक्टरांनी त्याला फॉर्मल पॅन्ट घालण्यास मनाई केली. जखम चिघळू नये, हा त्यामागचा हेतू होता. यामुळे अर्शदला खास हाफ पॅन्ट शिवून घ्यावे लागलेत. स्वत: अर्शदने ही माहिती दिली. मी सध्या सर्वत्र हाफ पॅन्टमध्ये वावरतोय. मी कुठलीशी फॅशन स्टेटमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असे लोकांना वाटतेय. पण असे अजिबात नाही. मी तर लॅक्मे फॅशन वीकमध्येही हाफ पॅन्ट घालूनच जाणार होतो. पण मारियाने मला समजावले. मग काय, शेवटी अतिशय नाराजीने मला माझा बेत बदलावा लागला, असे अर्शद म्हणाला. आता हे झाले खरे कारण. अर्शदने आपल्याला ते सांगितले. पण हे खरे कारण अर्शद सगळ्यांनाच सांगतो असे थोडीच आहे. शॉर्ट्समध्ये का फिरतोय? हा प्रश्न केवळ विचारायची देर. यावर अर्शद काय उत्तर देतोय, माहितीयं? माझे माय दीपिकाच्या पायांपेक्षा कमी सुंदर नक्कीच नाहीत. त्यामुळे मी माझे सेक्सी पाय दाखवत आहे, असे अर्शद सगळ्यांना सांगतोय. आहे ना, अर्शद विनोदी!

ALSO READ : अक्षय कुमार म्हणतो, अर्शदने साकारलेला जॉली ठरला माझ्यासाठी मार्गदर्शक
संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या मुन्नाभाईचा तिसरा भाग लवकरच

 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What is Arshad Warsi saying? So my feet are as sexy as Deepika, so I'm showing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.