ठळक मुद्दे'दे दे प्यार दे' हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला'दे दे प्यार दे' चित्रपट रोमँटिक कॉमेडी

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू आगामी चित्रपट 'दे दे प्यार दे' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणच्या वाढदिवसादिवशी आज या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

'दे दे प्यार दे' चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जवळपास तीन मिनिटे तब्बू व रकुल यांचे वादविवाद पाहायला मिळत आहेत. ट्रेलर पाहिल्यावर समजतंय की, अजयला रकुल आवडत असते. रकुल त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असते. रकुल जेव्हा त्याच्या घरी जाते तेव्हा तिला कळते अजयची एक्स वाईफ मंजू (तब्बू) आहे आणि त्यांना आयशा (रकुल प्रीत)च्या वयाची मुले आहेत. ट्रेलरमध्ये करीना आणि सैफचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा अजय जावेद जाफरीला सांगतो की, तो पहिला व्यक्ती नाही जो आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलीला डेट करतो आहे. यावेळी तो काही हॉलिवूड स्टार्स सोबत सैफिना म्हणजेच करीना व सैफचे उदाहरण देखील देताना दिसतो आहे.


'दे दे प्यार दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन, भूषण कुमार, कृष्ण कुमार व अंकुर गर्ग यांनी केली आहे आणि दिग्दर्शन अकीव अली यांनी केले आहे.

या चित्रपटात अजय देवगण, तब्बू व रकुल प्रीत सिंग यांच्या व्यतिरिक्त जिमी शेरगिल व आलोकनाथ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Watch De De Pyaar De Movie Trailer: Ajay Devgn, Tabu And Rakul Preet In Main Role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.