बॉलिवूडला अनेक लोकप्रिय गाणी देणारी साजिद-वाजिद या संगीतकारांची जोडगोळी अखेर तुटली. वाजिद यांनी उण्यापु-या वयाच्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. साजिद-वाजिद या जोडीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिलीत. वाजिद यांनी तर सलमानच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना आपला आवाजही दिला होता. सलमानला बॉलिवूडचा ‘दबंग’ बनवण्यात या गाण्यांचे मोठे योगदान आहे.
एकेकाळी सलमानच्या करिअरला ओहोटी लागली होती. त्याचे सिनेमे पाठोपाठ फ्लॉप होत होते. अशावेळी त्याला ‘वॉन्टेड’ हा सिनेमा मिळाला आणि सलमानच्या करिअरने पुन्हा कलाटणी घेतली. सलमानच्या या नव्या प्रवासाचा वाजिद खान एक मोठा भाग होते.  या चित्रपटातील ‘मेरा ही जलवा’ हे गाणे पुढील 10 वर्षे सलमानच्या आयुष्याची ‘लाइन’ म्हणून लक्षात राहिले.
‘पार्टनर’ या सिनेमापासूनच वाजिद सलमानचा आवाज बनला होता. साजिद-वाजिद जोडीने सलमानसाठी अनेक गाणी बनवलीत आणि वाजिद यांनी आपल्या आवाजाने या गाण्यांना सुपरहिटच्या यादीत नेऊन ठेवले.
अशाच काही गाण्यांवर एक नजर...

मेरा ही जलवा (वॉन्टेड)

सोनी दे नखरे ( पार्टनर)

तुझे अक्सा बीच घुमा दूं ( गॉड तुस्सी ग्रेट हो)

माशाल्लाह (एक था टाइगर)

फेविकॉल से (दबंग 2)

हमका पीनी है' ( 'दबंग')

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: wajid khan death some popular and hit songs sung by wajid for salman khan-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.