The wait of 'KGF 2' fans will end soon, the superstar will succeed and the shooting will start | 'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यश करणार शूटिंगला सुरूवात

'केजीएफ २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार, सुपरस्टार यश करणार शूटिंगला सुरूवात

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि चित्रीकरणासंबंधित सर्व गोष्टी थांबवण्यात आल्या होत्या मात्र, आता देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल करण्यात येत असून, अनेकांनी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, केजीएफच्या टीमने देखील आपल्या अन्य कलाकारांसोबत चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित सीक्वलच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. सुपरस्टार यश देखील सेटवर परतण्यासाठी उत्सुक असून 25 दिवसांहुन अधिक काळ तो त्याच्या तयारीत व्यस्त आहे.

अभिनेत्याच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, “या मोठ्या लॉकडाउननंतर, यशकेजीएफ 2 च्या चित्रीकरणासाठी प्रचंड उत्साहित आहे. ज्या दिवशी, चित्रीकरणास सुरुवात झाली आहे तेव्हापासूनच यशने आपल्या 'रॉकी भाय'च्या व्यक्तिरेखेसाठी आणि पूर्ववत फिजिकमध्ये परतण्यासाठी संपूर्ण ट्रेनिंगला सुरुवात केली आहे."


सूत्रांनी पुढे सांगितले की, “अभिनेता पुन्हा एकदा आपल्या रॉकी अवतारात येण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे आणि मोठ्या पडद्यावर आपल्या शरीराच्या योग्य प्रदर्शनासाठी उत्सुक आहे. त्याने आपल्या मेहनतीमध्ये कोणतीच कसर सोडली नसून ऑक्टोबरच्या मध्यात सुपरस्टार यश चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.”


केजीएफच्या पहिल्या भागाच्या सफलतेने केजीएफ 2 ला केवळ दाक्षिणात्य वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशातील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये नेऊन बसवले आहे. सुपरस्टार यश आणि केजीएफ चाहते पुन्हा एकदा त्यांच्या रॉकी भायची औत्सुकतेने वाट पाहत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The wait of 'KGF 2' fans will end soon, the superstar will succeed and the shooting will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.