vivek oberoi talks about controversy with salman khan after 17 years-ram | भाईजानसोबतच्या 17 वर्षांपूर्वीच्या भांडणावर पुन्हा एकदा बोलला विवेक ओबेरॉय़, म्हणाला...

भाईजानसोबतच्या 17 वर्षांपूर्वीच्या भांडणावर पुन्हा एकदा बोलला विवेक ओबेरॉय़, म्हणाला...

ठळक मुद्देसलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वैर जगापासून लपून राहिलेले नाही. ऐश्वर्या राय हे या वैराचे कारण हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2003 मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रात्री नशेत मला ४२ वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली,’ असा हा खुलासा होता. त्याच्या या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. अर्थात काही वषार्नंतर विवेक पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतला आणि आजही तो काम करतोय. हा सगळा एपिसोड सांगण्याचे कारण म्हणजे, विवेकची ताजी मुलाखत. होय, 17 वर्षांनंतर विवेक  पुन्हा एकदा या संपूर्ण एपिसोडवर बोलला.


  
नवभारत टाइम्सशी बोलताना विवेक म्हणाला, ही खूप जुनी गोष्ट आहे. मी आता माझ्या वैयक्तीत आयुष्या अशा ठिकाणी पोहोचलो आहे. ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी मला खूप लहान वाटतात. या निगेटिव्ह गोष्टींवर आपण जर बोलत राहिलो तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला आता सकारात्मक गोष्टींवर बोलायला हवे. जे घडले ते विसरून पुढे जायला हवे. मला कोणावर नाराजी किंवा राग नाही.’  

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती. 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवर सलमानचे ऐश्वयार्सोबत अफेयर सुरु होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी ऐश्वयार्ने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. पण सलमानला ते सहन झाले नाही. याचमुळे त्याने विवेकला फोन करून शिवीगाळ केली होती. पण आता कदाचित विवेक हे सगळे विसरराय. सलमानच्या मनात काय आहे, हे अर्थातच कुणालाही ठाऊक नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: vivek oberoi talks about controversy with salman khan after 17 years-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.