'ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं!', 'कुत्ते' चित्रपटात झळकणार तगडी स्टारकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:03 PM2021-08-23T16:03:49+5:302021-08-23T16:04:41+5:30

'कुत्ते' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

Vishal Bhardwaj and Love Ranjan come together for 'Kutte' | 'ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं!', 'कुत्ते' चित्रपटात झळकणार तगडी स्टारकास्ट

'ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं!', 'कुत्ते' चित्रपटात झळकणार तगडी स्टारकास्ट

Next

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीजची प्रस्तुती असलेल्या 'कुत्ते'च्या निर्मितीसाठी एकत्र येत असल्याची घोषणा आज केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज करत असून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची झलक सादर करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी मोशन-पोस्टरचे अनावरण केले असून प्रेक्षकांना एका रोमांचक सफरीचे दर्शन घडणार आहे. यात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारे लिखित, 'कुत्ते' एक सेपर-थ्रिलर असून सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे आणि साधारण २०२१ च्या शेवटी याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. आसमान स्कूल ऑफ विजुअल आर्ट्स, एनवाईसीमधून आपले फिल्म मेकिंग पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून आपल्या वडिलांना, विशाल भारद्वाज यांना '7 खून माफ', 'मटरु की बिजली का मंन्डोला' आणि 'पटाखा' यांमध्ये असिस्ट केले आहे. 

लव रंजनचे ट्विटरवर 'कुत्ते'चे मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं! या चित्रपटाचे मोशन पोस्टरला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.


’कुत्ते'बाबत बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, '''कुत्ते' माझ्यासाठी विशेष आहे कारण आसमान आणि मी दिग्दर्शक- निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र येतो आहोत आणि तो यासोबत काय करणार आहे हे पाहायला मी उत्सुक आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि मी या सहयोगासाठी देखील अतिशय उत्सुक आहे कारण,  मी चित्रपट निर्मिती आणि मजबूत व्यावसायिक समझ यासाठी लव यांच्या धाडसी दृष्टीकोनाचे खरोखर कौतुक करतो. 


त्यांनी पुढे सांगितले की, मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये नसीर साहब, तब्बू, कोंकणा आणि राधिका यांच्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आसमानने या सगळ्यांना या चित्रपटासाठी एकत्र आणले आहे. आम्ही हा मनोरंजक थ्रिलरपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.
'कुत्ते' लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनणारी, लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांची निर्मिती आहे आणि गुलशन कुमार व भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज करणार असून याची गाणी  गुलजार लिहिणार आहेत.

Web Title: Vishal Bhardwaj and Love Ranjan come together for 'Kutte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app