विरूष्काची लाडकी लेक वामिका झाली ६ महिन्यांची, अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:12 PM2021-07-12T12:12:25+5:302021-07-12T12:13:05+5:30

अनुष्का शर्माने वामिकाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबतचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Virushka's darling Lake Vamika is 6 months old, photo shared by Anushka Sharma | विरूष्काची लाडकी लेक वामिका झाली ६ महिन्यांची, अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

विरूष्काची लाडकी लेक वामिका झाली ६ महिन्यांची, अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

Next

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची लाडकी लेक वामिका नुकतीच सहा महिन्यांची झाली आहे. अनुष्का शर्माने वामिकाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबतचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विराट आणि अनुष्काने वामिकासोबत एका पार्कमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला आहे.


अनुष्का शर्माने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनुष्का एका पार्कमध्ये मॅटवर झोपल्याची दिसते आहे. तर वामिकाही तिच्यासोबत दिसते आहे. या फोटोत अनुष्का वामिकाला काहीतरी दाखवत असल्याचे पहायला मिळतेय.


तसेच अनुष्काने विराट आणि वामिकाचा देखील एक गोड फोटो शेअर केलाय. यात विराट लाडक्या लेकीसोबत खेळताना दिसतो आहे. हे फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले की, तिचे हास्य आमचे संपूर्ण जग बदलू शकते. आम्हाला आशा आहे की तुम्ही जसे पाहता त्याप्रमाणेच आम्ही ते प्रेम देऊ शकू.
अनुष्काच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करत वामिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


अनुष्का शर्माने ११ जानेवारी, २०२१ ला गोंडस मुलीला म्हणजेच वामिकाला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही.


अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. तिचे चाहते तिच्या कमबॅकची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: Virushka's darling Lake Vamika is 6 months old, photo shared by Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app